Jalgaon Crime News : जळगावला सराफ बाजारात दरोडा

जळगाव शहरातील मुख्य व महत्त्वाची बाजारपेठ असलेला सराफी बाजार पूर्णतः असुरक्षित असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
CCTV footage shows the robber walking out with a tommy in his hand
CCTV footage shows the robber walking out with a tommy in his handesakal
Updated on

Jalgaon Crime News : शहरातील मारुती पेठमधील ‘अलंकार ज्वेलर्स’ आणि त्याच्याच बाजूला असलेल्या ‘नूर पॉलिश सेंटर’ या दोन सराफी दुकानात पिस्तुलाचा धाक दाखवून कारागिरांच्या अंगावर पांघरूण टाकत सशस्‍त्र दरोडेखोरांनी तब्बल १४ लाख ५९ हजारांचे २५१ ग्राम सोन्याचे सामान लुटून नेल्याची घटना शुक्रवारी (ता. २६) पहाटे चारच्या सुमारास घडली.

शनिपेठ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. (Robbery at Jalgaon Saraf Bazar crime news)

जळगाव शहरातील मुख्य व महत्त्वाची बाजारपेठ असलेला सराफी बाजार पूर्णतः असुरक्षित असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सहा महिन्यांत सलग घरफोड्या आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, सराफी बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वरात्री सराफ बाजारातील सचिन प्रकाश सोनार (वय ३८, रा. रामपेठ, जळगाव) यांच्या सराफ बाजारातील मारुतीपेठ येथे ‘अलंकार’ नावाचे दागिने घडविण्याचे दुकान आहे. त्याच बाजूला ‘नूर पॉलिश सेंटर’ हे दुकान आहे.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दरोडेखोर आले व एकामागून एक दोन्ही दुकान फोडून दोन्ही दुकानांतून १४ लाख ५९ हजारांचे २५१ ग्रॅम सोन्याचे सामान लांबविले.

दिवस उजाडताना पहाटे चारला घडलेला प्रकार बाजारात कळाला. सचिन सोनार यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.

CCTV footage shows the robber walking out with a tommy in his hand
Nashik Crime : नकली सोने विकणारी परप्रांतीय टोळी जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

घटनास्थळावरून घेतलेल्या माहितीनुसार नूर ज्वेलर्स या पॉलिश दुकानाचा बंगाली कारागीर झोपले असताना त्यांना एकाने पिस्तूल लावून अंगावर पांघरून घालत शांत पडायला सांगितले.

त्यानंतर दोन्ही दुकाने फोडून १४ लाखांचा ऐवज लुटून नेल्याचे सांगण्यात येत असताना पोलिसांनी केवळ घरफोडीच्या कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.

"संशयिताच्या हातात शस्त्र असल्याबाबत काहीच आढळले नाही. कात्री असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. संशयित साधारण ३.२३ ला आत शिरले. अर्ध्याच तासात ते निघून गेल्याचे दिसते. शस्त्राबाबत काही माहिती मिळालेली नाही. तरी तपासात नेमके काय ते समोर येईल." -आर. टी. धारबळे, वरिष्ठ निरीक्षक, शनिपेठ

CCTV footage shows the robber walking out with a tommy in his hand
Nashik Crime News : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची पोत खेचली; संशयित कारमधून झाले पसार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com