जळगावात दरोडा; बुरखा घातलेल्या टोळीने दाम्पत्याला शस्त्राचा धाक दाखवून २३ लाखाचा मुद्देमाल लुटला

भूषण श्रीखंडे
Wednesday, 3 February 2021

पैसे मुद्देमाल घेवून पळून जात असतांना दरोडेखोर टोळीने तळमजल्यावर लावलेला सिसिटीव्हीचा डीव्हीआर काढून घेत पळाले.

जळगाव ः  शहरातील मोहाडी रस्त्यावरील दौलतनगरात एका व्यवसायिकाच्या घरात टोळीने जबरीने प्रवेश चाकुचा धाक दाखवून २३ लाख रुपये लुटून नेल्याची घटना आज पहाटे घडली. याबाबत रामानंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
 

आवश्य वाचा- महावितरणकडून लूट सुरूच; छुप्या करांमुळे दुप्पट वीजबिलाचा ‘शॉक’  ​
 

मोहाडी रोड येथील दौलतनगरात लोंखड सामान व्यवसायिक पिंटू बंडू इटकरे हे कुटंबासह राहतात. आज सकाळी सव्वातीन वाजता इटकरे कुंटबीय गाढ झोपेत असतांना त्यांच्या घरात सहा जणांची टोळी घसून इटकरे यांच्या पत्नीचे तोंड दाबुन उठवीले. नंतर इटकरे यांना चाकुचा धाक दाखवून उठवून घरातील तीन लाख रुपये रोख, २० लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली.  

बुरखा घातलेली टोळी 

पिंटू इटकरे यांच्या घरात घुसलेली टोळीतील पाच जणांनी बुरखा घातला होता. तर एकाने तोंडावर विदूषकाचे मास्क लावला होता. 

सिसीटिव्हीचा डिव्हीआर काढला

इटकरे यांच्या घरात सुमारे पंचेचाळीस मिनीट टोळी होती. पैसे मुद्देमाल घेवून पळून जात असतांना टोळीने तळमजल्यावर लावलेला सिसिटीव्हीचा डीव्हीआर काढून घेत टोळीने तसेच पिंटू इटकरे व त्यांच्या पत्नीचा मोबाईल फेकून देत पलायन केले.

वाचा- राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायतींचा बिगुल वाजणार 
 

घाबरलेल्या अवस्थेत पोलिस ठाण्यात

सकाळ झाल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत इटकरे दाम्पत्याने रामानंद पोलिस ठाणे गाठले. व घडलेला सर्व प्रकार सांगितला. रामानंद पोलिस तसेच एलसीबीच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery marathi news jalgaon robber knife couple scared robbed