Jalgaon Crime News: घराचे दार उघडून 70 हजार लंपास

Theft
Theftesakal

जळगाव : शहरातील शिवाजीनगरात इलेक्ट्रिशियन कुटुंबीयांसह शेजारच्यांकडे लग्नाला गेले होते. जेवण करून परतत नाही, तोपर्यंत त्यांच्या घरात चोरी झाली. चोरट्याने घरातील ७० हजारांची रोकड लंपास केली.

Theft
Jalgaon News: शिवाजीनगरातील रस्त्याचे काम सुरू का नाही? नागरिकांचा सवाल

शिवाजीनगर भागातील मिर्झा चौकातील शेख अकील शेख सलीम (वय २८) कुटुंब रविवारी (ता. १९) शेजाऱ्यांकडे लग्नानिमित्त उस्मानिया पार्कमध्ये जेवणासाठी गेले होते. शेख कुटुंबीयांनी घराचे दार खराब असल्याने नुसती कडी ओढून दार बंद केले होते. जेवण करून अकील शेख घरी परतले असता, त्यांना घराचे दार उघडे दिसले.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

आत जाऊन बघितले, तर घरातील गोदरेज कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून चोरट्याने ड्रॉवरमधील ७० हजारांची रोकड लंपास केल्याचे आढळले. शेख अकील यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचानाम केला. याबाबत शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Theft
Jalgaon Crime News: खिडकी तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश अन् कपाट तोडून दागिने लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com