
Jalgoan : RTO तर्फे 6 सेवा ‘फेसलेस पद्धतीने’ सुरू
जळगाव :आरटीओ (RTO) अर्थात परिवहन विभागामार्फत दुय्यम नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज, इतर राज्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (NOC), नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदल, वाहनचालक परवान्याचे दुय्यमीकरण, वाहनचालक परवान्यांवरील पत्ता बदला, वाहनचालक परवान्याचे नूतनीकरण या ६ सेवा फेसलेस पद्धतीने (Faceless Type) सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली. (RTO launches 6 services faceless Jalgaon News)
या सेवांचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराकडे आधारकार्ड (Adhar Card) व त्या आधारकार्डाशी मोबाईल नंबर जोडणी असणे आवश्यक आहे. या सेवांचा लाभ घेण्याकरिता या आधारक्रमांकाचा वापर करण्यात येणार असून, आधार क्रमांकामधील मोबाईलवर ओटीपी पाठविण्यात येणार असून, ओटीपीची नोंदणी परिवहन या संकेतस्थळामध्ये केलेल्या परवाना प्रमाणपत्रामधील अर्जदाराची माहिती व आधार अभिलेखातील अर्जदाराची माहिती याची खातरजमा झाल्यानंतरच अर्जदारास पुढे अर्ज करणे शक्य होणार आहे. वरील सेवांचा लाभ व अर्ज करण्यासाठी परिवहन विभागाच्या www.parivahan.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: जळगाव : पाचोरा, भडगाव तालुक्यात ५४ बंधारे
परवानाविषयक सेवांमध्ये परिवहन संवर्गाचे परवाना नूतनीकरणाकरिता ऑनलाइन अर्ज करणाऱ्या परवानाधारकांनी संगणकीय पोचपावतीसह दर गुरुवारी दुपारी तीनला उजळणी प्रशिक्षणाकरिता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील सभागृहात उपस्थित राहावे.
हेही वाचा: तरुणीकडे मोबाईल नंबर मागितल्याने दोन गटात हाणामारी
Web Title: Rto Launches 6 Services Faceless Jalgaon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..