Jalgaon News : वनजमीन मिळत असल्याच्या अफवेने पाल ग्रामस्थ जंगलात; कुऱ्हाडी, विळा घेऊन ताबा मिळविण्याचा प्रयत्न

Villagers rushed to take possession of the forest land some distance from Pal.
Villagers rushed to take possession of the forest land some distance from Pal. esakal
Updated on

Jalgaon News : येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गारबर्डी रस्त्यालगत वनजमिनी मिळत असल्याच्या अफवेने संपूर्ण गावाने जंगलाकडे धाव घेत हातात कुऱ्हाड, विळा घेऊन वनजमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. (Rumors of getting forest land Pal village in forest jalgaon news)

या राखीव वनजमिनीवर प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी आपला हक्क दर्शविणारे दगड ठेवले. या भागात राखीव वनक्षेत्रात परप्रांतीय व बाहेरगावातून आलेल्या नागरिकांना तथा खोट्या दावेदारांना जमिनी मिळत असल्याबाबत ग्रामस्थांकडून रोष व्यक्त होत असून, स्थानिक लोकांनी रहदारीसाठी वनजमीन मिळावी, या हेतूने या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे.

ग्रामस्थांनी सकाळी सहापासून वनजमिनी ताब्यात घेऊन सांभाळली आहे. या वनक्षेत्रात अतिक्रमणाचा ताबा करीत असल्याची बातमी वन्यजीव वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळविले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Villagers rushed to take possession of the forest land some distance from Pal.
Mahavitaran Worker Protest : कार्यकारी अभियंत्यांशी बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

पाल ग्रामस्थ म्हणतात...

पाल परिसरात जंगलात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होऊन शेकडो हेक्टर जमीन दावेदारांना शासनातर्फे मिळाली. आमच्या चार, पाच पिढ्या (पणजोबा, आजोबा) वर्षानुवर्षे या गावात स्थानिक राहात असून, आम्ही कधी जंगलात अतिक्रमण केले नाही.

अफवांना बळी पडू नका : वन विभाग

घटनास्थळी वनपाल अरविंद धोबी, वनरक्षक सहस्त्रलिंग लेदा बारेला, वनरक्षक सुधीर पटणे यांनी ग्रामस्थांची समजूत घालून त्यांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Villagers rushed to take possession of the forest land some distance from Pal.
Jalgaon News : ... अन् दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आले हास्य! 150 जणांना कृत्रिम हात-पाय प्रत्यारोपण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com