Sai Gopal Maharaj |आपले आयुष्य नीतिमत्तेने जगले पाहिजे : साई गोपाल महाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sai Gopal Maharaj

Sai Gopal Maharaj |आपले आयुष्य नीतिमत्तेने जगले पाहिजे : साई गोपाल महाराज

जळगाव : आपल्या देशात अनेक मतभेद, जातिभेद, धर्मभेद, व्यक्तीभेद असे भेद आहेत. मात्र, हे भेद न मानता आपण सर्वांनी एक म्हणून रहावे व वागावे. कोणीही कधीही कोणाला फसवू नये. प्रत्येकाने आपले आयुष्य नीतिमत्तेने जगले पाहिजे, असे मत बीड येथील कथाकार साईगोपाल देशमुख महाराज यांनी केले. (sai gopal maharaj statement about life god sai katha jalgaon news)

मेहरूण येथील श्री साईबाबा मंदिराच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘दरबार मेरे साई का’ या चारदिवसीय साई कथेस रविवार (ता. २२)पासून प्रारंभ झाला. प्रारंभी मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीला आणि प्रतिमेला महाराजांनी माल्यार्पण करून पूजन केले.

नगरसेवक प्रशांत नाईक यांनी प्रस्ताविकात मंदिर व साई कथेची माहिती दिली. त्यानंतर कथेस महाराजांनी प्रारंभ केला. राज सिंधी व भूषण सोनार यांनी ‘भर दो झोली मेरी या मोहंमद’ ही कव्वाली, तर ‘गणेश वंदना’ शुभम बोऱ्हाडे यांनी सादर केली. ‘गोंधळ’ भूषण सोनार यांनी, तर ‘आप मान जाओ साई’ हा मुजरा शशिकांत सरोदे यांनी सादर केला.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Jalgaon News: पाच संकुल बाजारपट्ट्यात रात्री सफाईचा प्रस्ताव; मक्तेदाराकडून काम

औरंगाबाद येथील निवृत्त न्यायाधीश किशोर देशमुख प्रमुख पाहुणे होते. साई कथा दररोज सायंकाळी साडेसातला सुरू होणार आहे. कथेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले आहे.

हेही वाचा: Jalgaon News : आदिवासी कोळी जमातीचे जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू

टॅग्स :JalgaonLifedevotional