
Jalgaon News : आदिवासी कोळी जमातीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू
जळगाव : आदिवासी महादेव कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, मल्हार व डोंगर कोळी यांना अनुसूचित जमातींची प्रमाणपत्रे दिले जात नाही. जिल्ह्यात या जमातीच राहत नसल्याचे सांगत जाणीवपूर्वक छळवणूक होत आहे. (tribal koli society agitation for various demands started at collector office jalgaon news)
याविरोधात खानदेशातील हक्क बचाव, संविधान बचाव आक्रोशासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीनदिवसीय धरणे आंदोलनाला मंगळवार (ता. २४)पासून सुरवात झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २४ ते २६ जानेवारीदरम्यान आंदोलन होणार आहे. आंदोलनात जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजबांधव सहभागी झाले आहेत.
प्रवर्तन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मदन शिरसाळे, ॲड. विक्रम देवराज, योगेश बाविस्कर, वाल्मीक लव्य सेवा अध्यक्ष ॲड. गणेश सोनवणे, प्रदीप सोनवणे, प्रमोद सोळुंके, युवराज सोळुंके, राहुल सोनवणे, किशोर सोळुंके, पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
हेही वाचा: Jalgaon News : महापालिका अर्थ विभागाचा कारभार ढेपाळला; नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास
महाराष्ट्रातील ठराविक जमातीच्या लोकांनी व त्यांच्या राजकीय समर्थकांनी एकत्र येऊन निर्माण केलेली प्रस्थापित शक्ती ७० वर्षांपासून कार्यरत आहे. आमदार तेच, मंत्रीही इकडून तिकडून तेच. त्यामुळे आदिवासींच्या विकासासाठी केंद्राकडून आलेल्या निधीत भ्रष्टाचार झाला आहे.
जिल्ह्यात आदिवासी कोळी जमातीचे लोक राहत नाही, अशा पद्धतीने प्रशासकीय स्तरावर बोगस प्रचार केला जात आहे, तर बिगर आदिवासी म्हणून हिनवणे व मूळच्या आदिवासींना संपविण्याचा कार्यक्रम सुरू आहे.
याचा निषेध करण्यात आला. मूळ आदिवासींना वारंवार खोटे ठरविण्यासाठी त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळू नये, सेतूवाल्यांनी अर्ज स्वीकारू नयेत, अशा तोंडी सूचना दिल्या जातात. या सर्व प्रकाराचा निषेध करत तीन दिवस आंदोलन सुरू राहणार असल्याचे मदन शिरसाळे यांनी सांगितले.
हेही वाचा: Jalgaon News: पाच संकुल बाजारपट्ट्यात रात्री सफाईचा प्रस्ताव; मक्तेदाराकडून काम