Sakal Exclusive : राज्यात सरल प्रणाली ‘युडायस’चे होणार एकत्रिकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UDISE

Sakal Exclusive : राज्यात सरल प्रणाली ‘युडायस’चे होणार एकत्रिकरण

अमळनेर (जि. जळगाव) : राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांची माहिती संकलित करण्यासाठी आता सरल प्रणाली व युडायस (UDISE) प्रणालीचे एकत्रिकरण करून शाळा व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या २९ कोटी ६६ लाखाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचे शासन परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव समीर सावंत यांनी मंगळवारी (ता.१५) निर्गमित केले आहे. (Sakal Exclusive saral system UDISE will be integrated in state jalgaon News)

हेही वाचा: Nashik : स्थगिती दिलेल्या 65 कोटींच्या कामांकडे डोळे; पालकमंत्र्यांना यादी मिळेना

राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती ठेवण्यासाठी व त्यासंबंधी शैक्षणिक व प्रशासकीय नियोजनासाठी राज्य शासनाने सरल प्रणाली व केंद्र शासनाने ‘युडायस’ (UDISE) प्रणाली कार्यान्वित केलेली आहे. या माहितीचा उपयोग शालेय शिक्षण विभागामार्फत विविध प्रकारचे नियोजन करणे, पर्यवेक्षण व सनियंत्रण करणे आदीसाठी केला जातो.

एकत्रित करण्याच्या कामासाठी २९ कोटी ६६ लाखाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा खर्च गव्हर्नन्स कार्यक्रम २२०२ एच ४५४ या सहायक अनुदाने या लेखाशिर्षातून २०२२-२३ च्या उपलब्ध तरतुदीमधून भागविण्यात येणार आहे. हा शासन निर्णय मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या ११ ऑगस्ट २०२२ च्या बैठकीतील मान्यतेनुसार देण्यात आला आहे.

हेही वाचा: Nashik : आता गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी शुल्क पावतीची सक्ती; ठेकेदारांचे धाबे दणाणले

बैठकीत मिळाली मान्यता

राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांची माहिती संकलित करण्यासाठी आजमितीस सरल प्रणाली व ‘युडायस’ (UDISDE) प्रणाली स्वतंत्ररित्या कार्यान्वित आहे. शाळांना त्यांची माहिती सरल व ‘युडायस’ प्रणालीमध्ये स्वतंत्रपणे भरावा लागतो.

या माहितीची द्विरुक्ती व असंतुलन टाळण्यासाठी विभागाने या दोन्ही प्रणालीचे एकत्रिकरण करुन शाळा व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याच्या प्रस्तावास ९ जून २०२१ च्या प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे शाळा व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या पार्श्वभूमीवर शासनाने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: Child Health: 'संसर्गजन्‍य'चे प्रमाण घटले; बालकांत मानसिक- शारीरिक आजारांचे धोके वाढले!

टॅग्स :Jalgaonschool