Sakal Impact News : ..अखेर ‘त्या’ जुन्या वसाहतीवर हातोडा; आमदार अनिल पाटील यांच्या उपोषणाला यश

Amalner: The dilapidated construction of this old police colony has started falling down.
Amalner: The dilapidated construction of this old police colony has started falling down.esakal

Jalgaon News : जुन्या पोलिस वसाहतीचे बांधकाम पाडायला सुरुवात झाली असल्याने प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच कामाचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात होणार आहे.

आमदार अनिल पाटील यांनी महसूल आणि प्रशासकीय इमारत अशा दोन इमारती मंजूर केल्या होत्या.

अमळनेर तालुक्याची उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालय असलेली दुमजली महसूल इमारत आणि सर्व शासकीय कार्यालये एकाच मध्यवर्ती ठिकाणी असणारी प्रशासकीय इमारत जुन्या पोलिस वसाहतीच्या जागी मंजूर होऊन निधीही प्राप्त झाला होता. (Sakal Impact News Paving way for administrative ownership success of Mla Patil hunger strike finally hammer on that old building Jalgaon News)

मात्र पोलिस प्रशासन जागा खाली करत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला काम सुरू करण्यास अडचणी येत होत्या. उच्च न्यायालय आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर देखील काम सुरू होत नसल्याने १२ जूनला आमदार अनिल पाटील यांनी तालुक्यातील जनतेसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते.

आंदोलनाच्या प्रभावामुळे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी १५ दिवसांत काम सुरू करतो, असे आश्वासन दिले होते तर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सात दिवसांत जागेचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्याचे आदेश दिले होते.

मात्र, सात दिवसांच्या आत कामाला गती मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिसांची जुनी घरे पाडण्यास सुरू केली आहे. यामुळे लवकरच महसूल इमारतीच्या कामाला सुरुवात होणार असून, तालुक्याच्या जनतेची सोय होणार आहे.

Amalner: The dilapidated construction of this old police colony has started falling down.
Jalgaon Crime News : पतीला मारहाण करून पत्नीचा विनयभंग

"अमळनेर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे देखील संघर्ष सुरू राहील. प्रशासकीय इमारतीच्या उपोषणासाठी सर्वच अमळनेरकर एकत्र आल्याचा अभिमान आहे. प्रशासकीय इमारतीमुळे अमळनेरच्या विकासात नक्कीच भर पडणार आहे."

- अनिल पाटील, आमदार, अमळनेर

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Amalner: The dilapidated construction of this old police colony has started falling down.
Jalgaon Crime News : पतीला मारहाण करून पत्नीचा विनयभंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com