Jalgaon News | ग्राहकांनी फसवणूक न होण्यासाठी दक्ष राहावे : जिल्हाधिकारी अमन मित्तल

Jalgaon: Collector Aman Mittal, District Supply Officer Sunil Suryavanshi etc. during the release of consumer awareness booklet at district level National Consumer Day program on Saturday
Jalgaon: Collector Aman Mittal, District Supply Officer Sunil Suryavanshi etc. during the release of consumer awareness booklet at district level National Consumer Day program on Saturdayesakal

जळगाव : ग्राहकांनी आपली फसवणूक होऊ नये, यासाठी दक्ष राहावे. फसवणूक झाल्यास जरूर दाद मागावी. ग्राहक संरक्षणाचे कार्य पथनाट्यासारख्या कार्यक्रमातून ग्रामीण भागातही पोहोचावे.

ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहताना आपले कर्तव्य आणि जबाबदारीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले. (Collector Aman Mittal says Consumers should be careful not to be cheated Jalgaon News)

Jalgaon: Collector Aman Mittal, District Supply Officer Sunil Suryavanshi etc. during the release of consumer awareness booklet at district level National Consumer Day program on Saturday
Jalgaon News : सात तालुक्यांत मुलींच्या संख्येत घट; PCPNDT बैठकीत माहिती उघड

जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात शनिवारी (ता. २४) झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ग्राहक संरक्षण क्षेत्रातील विजय मोहरीर, डॉ. अनिल देशमुख, राजस कोतवाल, हेमंत भांडारकर, विकास महाजन यांनी ग्राहक संरक्षण क्षेत्रातील अनुभव, ग्राहकांच्या तक्रारींची केलेली सोडवणूक, ग्राहक संरक्षणाची चळवळ, ग्राहकांनी जागृत कसे राहावे, फसवणूक झाल्यास तक्रार कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले.

सायबर गुन्ह्यांबाबत काय दक्षता घ्यावी, ग्राहक फसवणुकीस कसा बळी पडतो, सोशल मीडिया वापरताना काय खबरदारी घ्यावी, याचे समर्पक मार्गदर्शन सायबर गुन्हे शाखेचे निरीक्षक थोरात यांनी केले.

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

Jalgaon: Collector Aman Mittal, District Supply Officer Sunil Suryavanshi etc. during the release of consumer awareness booklet at district level National Consumer Day program on Saturday
Jalgaon News : रस्त्याचा प्रश्‍न विधिमंडळातही गाजला; पण दुरुस्ती कधी?

यंदाच्या ग्राहक दिनासाठी केंद्र शासनाने ‘इफेक्टीव्ह डिस्पोजल ऑफ केसेस इन कन्झ्युमर कमिशन्स’, अशी संकल्पना (थीम) दिली होती. त्यानुसार जिल्हा पुरवठा शाखेने तयार केलेले पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन श्री. सूर्यवंशी यांनी सादर केले. या सादरीकरणातून ग्राहकांचे हक्क व ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्या नवीन व विशेष तरतुदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ग्राहक संरक्षण कायद्याचा इतिहास, या कायद्याचे बदललेले स्वरूप आणि व्यापकता, ग्राहकाचे हक्क आणि कर्तव्ये याबाबत दिशा समाज प्रबोधन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले. गद्य-पद्याचा सुरेख मेळ साधून हसतखेळत पथनाट्यातून ग्राहक प्रबोधनाचा संदेश देण्यात आला.

जळगाव जिल्हा ग्राहक आयोगाने ग्राहक जनजागृतीबाबत तयार केलेल्या विशेष मार्गदर्शनपर पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी मित्तल यांच्या हस्ते झाले. मनियार विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, आयटीआयमधील एनएसएसचे विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. नयना महाजन यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांनी आभार मानले. के. एम. पाटील, वृंदा पाटील, शुभांगी बिऱ्हाडे, रेखा सावंत, पाराजी बोबडे, किशोर पाटील, पी. एस. पाटील, संध्या पवार यांनी सहकार्य केले.

Jalgaon: Collector Aman Mittal, District Supply Officer Sunil Suryavanshi etc. during the release of consumer awareness booklet at district level National Consumer Day program on Saturday
Jalgaon News : सोन्याच्या दरवाढीचा उच्चांक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com