Sakal NIE Camp : कलाकृती बनविण्यात, पक्ष्यांच्या दुनियेत रमली मुले; कलागुणांचेही सादरीकरण

Sakal NIE Camp
Sakal NIE Campesakal

Jalgaon News : ‘सकाळ-एनआयई’ व श्री चैतन्य हॉस्पिटल आयोजित उन्हाळी शिबिराच्या दुसऱ्या दिवशी मुलांनी ट्युलिंग पेपरपासून विविध कलाकृती बनवल्या, तर निसर्गाशी एकरूप होताना विविध पक्ष्यांची माहितीही जाणून घेतली. (Sakal NIE Camp On second day children made various art work from tuling paper and learned about different birds jalgaon news)

मधल्या सत्रामध्ये आपल्यातील विविध कुलागुणांचे सादरीकरण करत नृत्य, योगाभ्यासाचे धडेही घेतले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण जोपासले जावेत, त्यांना विविध विषयांची ओळख व्हावी आणि त्यांची उन्हाळी सुटी चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी उपायुक्त ठरावी म्हणून ‘सकाळ-एनआयई’तर्फे दर वर्षी उन्हळी शिबिराचे (समर कॅम्प) आयोजन केले जाते. यंदाही भारतीय जैन संघटनेच्या सभागृहात श्री चैतन्य हॉस्पिटलसह हॉटेल सुलक्स, नंदग्राम गोधाम यांच्या सहकार्यातून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

दुसऱ्या दिवशीही धमाल

शिबिराच्या दुसऱ्या दिवशीही मुलांनी दुपारपर्यंतच्या प्रत्येक सत्रात चांगलीच धूम केली. सकाळी योगासनांनी शिबिराची सुरवात झाली. नंतरच्या सत्रात विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांचे सादरीकरण केले. कुणी नृत्य करून दाखवले, तर कुणी गाणी म्हटली. काहींनी मिमिक्री सादर केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Sakal NIE Camp
Sakal NIE Camp : योगाभ्यासासह नृत्य, संगीत, खेळांत रमले चिमुकले; उन्हाळी शिबिरास सुरवात

आकर्षक कलाकृती बनविल्या

सलोनी वाणी यांनी मुलांना ट्युलिंग पेपरच्या सहाय्याने विविध कलाकृती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. मुलांकडून त्यांनी आकर्षक कलाकृती करवून घेतल्या. तिसऱ्या सत्रात नृत्य प्रशिक्षक बंटी मोटे यांनी मुलांना आजही नृत्याचे धडे दिले.

पक्ष्यांच्या दुनियेत रमले

नंतरच्या सत्रात पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ यांनी विद्यार्थ्यांना पक्ष्यांविषयी माहिती दिली. लॅपटॉपवर विविध पक्ष्यांची चित्रे, व्हिडिओ दाखवत या पक्ष्यांची भारतीय व विदेशी नावे, त्यांची वैशिष्ट्ये याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. सत्राच्या मध्यांतरात विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक खेळांचा मनमुराद आनंद लुटला.

शिबिरात आज...

- पहिल्या सत्रात योगाभ्यास, विविध खेळ
- दुसरे सत्र : इनबॉक्ट क्रिएटिव्ह लर्निंग ॲक्टिव्हिटी : मनोज गोविंदवार
- तिसरे सत्र : गडकिल्ल्यांची माहिती : देवदत्त गोखले
- चौथे सत्र : मानसिक आरोग्य, योगा व फनी गेम्स : दीपाली देशमुख

Sakal NIE Camp
Chalisgaon Market Committee Election : दिग्गजांनी दंड थोपटल्याने चुरस; आरोपांच्या फैरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com