
Jalgaon News : शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ‘सकाळ- एनआयई’ व श्री चैतन्य हॉस्पिटल आयोजित उन्हाळी शिबिरास सोमवारी (ता. २४) जल्लोषात प्रारंभ झाला. सकाळच्या रम्य वातावरणात योगाभ्यास करत नंतर संगीतखुर्ची, नृत्याचे धडे गिरवत चिमुकली पारंपरिक खेळांमध्ये चांगलीच दंग झाली. (sakal nie summer camp organized by NIE and Shree Chaitanya Hospital started on 24 april jalgaon news)
‘सकाळ’च्या एनआयई व्यासपीठातर्फे दर वर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदाही श्री चैतन्य हॉस्पिटल, हॉटेल सुलक्स, नंदग्राम गोधाम व भारतीय जैन संघटनेच्या सहकार्यातून हे शिबिर २४ ते २८ एप्रिलदरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
पहिला दिवस गाजला नृत्य, पारंपरिक खेळाने
शिबिराचा आज पहिला दिवस होता. भारतीय जैन संघटनेच्या भास्कर मार्केटलगतच्या सभागृहात सकाळी साडेसातला विद्यार्थ्यांनी एकत्र जमत सुरवातीला ओंकार, योगाभ्यास केला. नंतरच्या सत्रात नृत्यशिक्षक गुरुकुल डान्स क्लासेसचे बंटी मोटे यांनी ऊर्जात्मक गाण्यांवर मुलांना नृत्याचे धडे दिले. ‘बम बम बोले...’सह अन्य गीतांवर मुलांनी मस्ती केली. आकाश धुमाळ-पाटील यांनी मुलांना रस्सीखेच, लगोरी, आबाधोबी, लंगडी-पळी, तळ्यात-मळ्यात आदी पारंपरिक खेळांमध्ये गुंतवून ठेवले.
मुलांच्या हस्ते उद्घाटन
शिबिरार्थींमधील मुलांमधून दोघांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी श्री चैतन्य हॉस्पिटलचे डॉ. शीतल व डॉ. अविनाश भोसले, ए. टी. झांबरे विद्यालयाच्या प्राचार्या प्रणिता झांबरे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ‘सकाळ’तर्फे मुख्य बातमीदार सचिन जोशी, एचआर विभागप्रमुख नितीन सोनवणे, वितरण व्यवस्थापक राकेश पाटील यांनी केले. समन्वयिका हर्षदा नाईक यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. नेहा सपकाळे व सोनाली साळी यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभत आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
हम होंगे कामयाब...
शाळेला सुटी लागल्यानंतर मुलं इथे खेळ, मस्ती करण्यासाठी जमली आहेत. आता सलग पाच दिवस मुलांनी जोरदार धमाल करावी, असे आवाहन करत डॉ. शीतल भोसले यांनी मुलांना ‘हम होंगे कामयाब...’ हे गीत शिकवत त्यांच्याकडून ते एका तालासुरात म्हणून घेतले.
मस्ती करा, पण काळजी घ्या
"उहाळ्याची सुटी लागल्यानंतर या धमाल करणाऱ्या शिबिरात मुलांनी मस्ती करावी, खूप खेळावे, धमाल करावी; पण सोबतच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी." -डॉ. अविनाश भोसले, बालरोगतज्ज्ञ
"शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ’तर्फे आयोजित उपक्रम नेहमीच कौतुकास्पद असतात. अभ्यासाच्या भारातून सुटीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर निश्चितच आनंददायी, त्यांच्या विकासात भर टाकणारे ठरेल." - प्रणिता झांबरे, प्राचार्या, ए. टी. झांबरे विद्यालय
आज शिबिरात...
- योगा, नृत्याचे धडे व खेळ
- ट्युलिंग पेपर क्राफ्ट
- पक्षी निरीक्षणासह बरेच काही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.