Jalgaon News : जिल्हा बँकेला ‘दगडी बँकेचे’ वैभव आणणार; संजय पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Pawar president of Zilla Bank expressed that we will try to instilling faith among farmers through work jalgaon news

Jalgaon News : जिल्हा बँकेला ‘दगडी बँकेचे’ वैभव आणणार; संजय पवार

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला एकेकाळी मोठे वैभव होते. त्यावेळी शेतकऱ्यांमध्ये ‘दगडी बँक’ अशी तिची ओळख होती.

तोच विश्‍वास कामाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये रूजवून ते वैभव पुन्हा आणण्याचा आपला प्रयत्न असेल, असे मत जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केले. (Sanjay Pawar president of Zilla Bank expressed that we will try to instilling faith among farmers through work jalgaon news)

दरम्यान, अमळनेर येथील मंगळग्रह देवाचे दर्शन घेऊन त्यांनी मंगळवारी (ता. १४) पदभार स्वीकारला.जिल्हा बँकेच्या अधयक्षपदी संजय पवार अवघ्या एक मताने निवडून आले.

त्यांनी मंगळवारी अमळनेरला मंगळग्रह देव मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख होते. त्यानंतर जळगाव येथे आल्यावर बँकेत जाऊन त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

याबाबत ‘सकाळ’शी बोलताना अध्यक्ष संजय पवार म्हणाले, की जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, दोन्ही खासदार, तसेच जिल्हा बँकेचे सर्व संचालकांची साथ घेऊन आपण काम करणार आहोत.

शेतकऱ्यांचे हित जोपसणे हेच आपले ध्येय असणार आहे. दोन्ही मंत्री व जिल्ह्यातील सर्व आमदारांना सोबत घेऊन आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण भेट घेणार आहोत.

बँकेची थकहमी मिळविण्याबाबत प्रयत्न करणार आहोत. बँकेला एनपीएतून बाहेर काढण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेची शहराच्या मध्यवर्ती भागात इमारत आहे. त्यावेळी येथून त्याचा कारभार होत असे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात होते. त्यामळे ‘दगडी बँक’ म्हणून एक मजबूत विश्‍वास जिल्हा बँकेच्या कार्यावर शेतकऱ्यांचा होता. तोच विश्‍वास व वैभव पुन्हा आणण्याचा आपला प्रयत्न असेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :BankJalgaonDistrict Bank