Jalgaon Cotton News: कापसाच्या प्रश्नांवर पणन संचालक संजय पवारांचा सरकारला ‘घरचा आहेर’

sanjay pawar
sanjay pawar esakal

Jalgaon Cotton News : राज्यात कांदा आणि संत्री पिकांच्या बाबतीत सर्वच आवाज उठवत आहेत; परंतु कापूस उत्पादक मोठ्या प्रमाणात अडचणीत असताना त्याबाबत सर्व जण गप्प आहेत.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याबाबत विधिमंडळात आवाज उठवावा, असा ‘घरचा आहेर’ राज्याचे पणन महासंघाचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिला आहे. (sanjay pawar statement People representative should raise their voice on cotton issues jalgaon news)

खानदेशात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. कापसाला भाव नसल्याने आजही मोठ्या प्रमाणात कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. व्यापारी कवडीमोल भावात कापूस खरेदी करीत असल्याने शेतकरी चिताग्रस्त आहेत. याशिवाय, अवकाळी पावसाने कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दिवाळी झाल्यावर सरकारने अद्याप कापसाची खरेदी सुरू केली नाही. याबाबत श्री. पवार म्हणाले, की कापसाची शासकीय खरेदी सुरू करावी, यासाठी आपण सरकारला पत्र दिले आहे. कापूस उत्पादकांची परिस्थिती दयनीय झाली. शेतकऱ्यांनी कापसाची वेचणी केली; परंतु शासकीय खरेदी सुरू नसल्याने कापूस घरात पडून आहे. व्यापारी कमी दरात कापूस घेत आहेत. अशा स्थितीत शेतकरी अडचणीत सापडला, असे पत्रात नमूद करण्यात आले.

sanjay pawar
Nashik Onion Purchase: ‘एनसीसीएफ’तर्फे कांद्याची 3 हजारांनी खरेदी सुरू; जिल्ह्यात 12 केंद्रे

मदत व पुनर्वसनमंत्र्यांनी लक्ष द्यावे

राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील हे जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत श्री. पवार यांनी आपण त्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, असे पत्र देऊनही त्यांनी लक्ष दिले नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, की जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कापूस उत्पादकांच्या प्रश्‍नांवर गप्प आहेत. सर्वपक्षीय आमदारांनी कापूस उत्पादकांच्या प्रश्‍नांवर आवाज उठवत न्याय मिळवून द्यावा.

खरेदी सुरू करण्यासह अनुदान द्या

जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू करण्यासह शेतकऱ्यांच्या कापसाला तातडीने अनुदान जाहीर करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे पत्र देऊन केली आहे. त्याबाबत लवकर निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

sanjay pawar
Nashik Cotton Crop Crisis: पांढऱ्या सोन्यातून 500 कोटींची फसवणूक! पावसाअभावी उत्पादनात 70 टक्के घट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com