Jalgaon News : सात्री ग्रामस्थांच्या आंदोलनाने शासनाला फुटला घाम!

Satri villagers while blocking the road
Satri villagers while blocking the roadesakal

कळमसरे (जि. जळगाव) : सात्री ता. अमळनेर येथील ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी प्रजासत्ताकदिनी जल आंदोलन छेडून प्रशासनाला धारेवर धरले होते. मात्र या आंदोलनादरम्यान प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर तुर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा १ मे महाराष्ट दिनी याहीपेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल असाही इशारा महेंद्र बोरसे यांच्यासह सात्रीकरांनी दिला आहे. (Satri Village agitation made government shock police stopped villagers who going for Jalasamadhi Jalgaon News)

विविध मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात शासनाने आतापर्यंत केवळ आश्वासनच दिले आहे. समस्या सुटतच नसल्याने त्रस्त झालेल्या सात्री येथील ग्रामस्थांनी प्रजासत्ताकदिनी निम्न तापी प्रकल्प पाडळसरेच्या जलसाठ्यात ग्रामस्थांसह जलसमाधी घेण्याचा इशारा निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांना दिला होता.

त्यानुसार २६ रोजी सकाळी १०:३० वाजता ग्रामस्थ पाडळसरे जात असताना पोलिसांनी त्यांना गोवर्धन येथे अडविले. याच ठिकाणी ग्रामस्थांनी रस्ता रोको व ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी निम्न तापी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मुकुंदा चौधरी, उपकार्यकारी अभियंता व्ही एस पाटील यांनी लेखी आश्वासन देत समजूत काढली.

प्रांताअधिकारी व तहसीलदार यांच्या वतीने मंडळ अधिकारी एन. आय. कटारे, तलाठी वाल्मिक पाटील यांनी लेखी आश्वासन दिले. सदर आश्वासनात नमूद केले आहे की, गावास बारमाही रस्ता पाटचारी मार्गाने रस्त्याची मागणी केली आहे.

याबाबत ग्रामसभेत चर्चा व एकमताने ठराव करून पर्यायी रस्त्याचा मार्ग निश्चिती करावा व तसे शासनास कळवावे, गृह संपादन प्रस्ताव गावठाण कामाच्या अधिसुचनेस जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मान्यता देण्यात आली असुन कामकाज सुरू आहे.

Satri villagers while blocking the road
Nashik News : नाशिक शहरात युवतीची अन् विवाहितेची आत्महत्या

दोन्ही मयतांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी शासनास प्रस्ताव सादर केला असून मुख्यमंत्री सहायता निधीतुन मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याची कार्यवाही सुरू आहे. पुर्नवसन गावठाण मधील भूखंड वाटप बाबत शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी म्हणून शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे.

मागण्यांची पुर्तता करणे तसेच गावातील समस्यांचे निराकरण करण्याबाबत सर्व कार्यवाही शिघ्रगतीने सुरू असल्याने आपण कोणत्याही प्रकारची जल समाधी करू नये अशी विनंती या लेखी आश्वासनांत करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार यांनी नगरपालिका प्रशासनाला पत्र देत पालिकेत असलेली बोट व आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी असलेले साहित्य सात्री ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावे असे नमूद केले आहे. यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या विनंती मान्य करत आंदोलन मागे घेतले.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

Satri villagers while blocking the road
Nashik Crime News : घरफोड्यांत 2 लाखांचा ऐवज लंपास

यावेळी माजी सरपंच महेंद्र बोरसे, रवींद्र बोरसे, सरपंच सखुबाई भील, सचिन बोरसे, मनोहर बोरसे, भीला पाटील, सुमनबाई भील, सुनील बोरसे, भटाबाई भील, सुनंदा भील, बेबाबाई भील, निर्मलाबाई पाटील, चंद्रकलाबाई पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, पीएसआय बाळकृष्ण शिंदे, हवालदार भरत ईशी, फिरोज बागवान, सुनील तेली, संजय पाटील, रेखा परदेशी, सुनील अगोणे यासह मारवड पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

पावसाळ्यात अत्याअवश्यक साठी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी ग्रामपंचायतकडे आजच पावर बोट सुपूर्द केली. आंदोलनाचे नेतृत्व महेंद्र बोरसे यांनी केले. स्वत: ट्रॅक्टर चालवीत आंदोलकांना नेत असताना मारवड पोलीसांनी त्यांना रस्त्यावर अडविले. आंदोलन स्थळी जाऊ दिले नाही म्हणून रास्ता रोको केला.

याच ठिकाणी मागण्यासंदर्भात आंदोलन स्थळी पत्र प्राप्त झाले. यावेळी आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनाने तालुका प्रशासनसह जिल्हा प्रशासन हादरले होते.सात्री ग्रामस्थांना शासनाने लेखी पत्र जरी दिले असले तरी या गावाच्या समस्या बाबत गांभीर्य घ्यावे असाही सुरु उमटत आहे.

Satri villagers while blocking the road
Nashik Crime News : बंदी असलेला 4 लाखांचा गुटखा जप्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com