Nashik Crime News : बंदी असलेला 4 लाखांचा गुटखा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gutkha seized

Nashik Crime News : बंदी असलेला 4 लाखांचा गुटखा जप्त

नाशिक : राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची शहरात मोठ्या प्रमाणात खरेदी -विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गुटख्याची राजरोसपणे वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या हाती लागला असून चालकास बेड्या ठोकत पथकाने टेम्पोसह गुटखा असा सुमारे सव्वा चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. (Banned gutkha worth 4 lakh seized Nashik Crime News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने औद्योगीक वसाहतीत केलेल्या कारवाईत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप श्रीकांत पांडे (३२ रा.रिंकी संकूल समोर उपेंद्रनगर) असे अटक करण्यात आलेल्या गुटखा तस्कराचे नाव आहे.

औद्योगीक वसाहतीतून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती युनिट २ च्या पथकास मिळाली होती त्यानुसार गुरूवारी (ता.२६) अंबड लिंकरोडवरील हॉटेल न्यू इंडियासमोर पोलिसांनी वाहन तपासणी केली असता संशयित मुद्देमालासह पोलिसांच्या हाती लागला.

एक्स्लो पॉईंट कडून पपया नर्सरीच्या दिशेने जाणाºया महिंद्रा जितो या वाहनास अडवून पोलिसांनी तपासणी केली असता त्यात गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. त्यात विविध प्रकारचा गुटखा,सुगंधी सुपारीचा समावेश आहे. संशयितास अटक करून पोलिसांनी टेम्पोसह गुटखा जप्त केला असून याप्रकरणी हवालदार गुलाब सोनार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.