टरबुजाला मातीमोल भाव; शेतकऱ्याने 2 एकर टरबुजांवर फिरवला नांगर

टरबुजांच्या लागवडीवर झालेला खर्चही निघत नसल्याने टरबूज उत्पादकांच्या पदरी निराशा पडली आहे.
Watermelon
Watermelonesakal
Updated on

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : ‘सौदा करतात मालाचा, सारे मिळूनी व्यापारी... कष्ट केले किती अपार, पोटभर मिळेना हो भाकरी...’ या शाहीर नितीन रसाळ यांच्या ‘जगाचा पोशिंदा’ या कवितेतील ओळींचा प्रत्यय सध्या गिरणा पट्ट्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत येत आहे. वाढत्या उन्हाच्या दाहकतेमुळे टरबूजांचे प्रचंड नुकसान होत असताना बाजारात टरबुजांना कवडीमोल भाव मिळत आहे. टरबुजांच्या लागवडीवर झालेला खर्चही निघत नसल्याने टरबूज उत्पादकांच्या पदरी निराशा पडली आहे.

चाळीसगाव तालुक्यात यावर्षी सुमारे तीनशे हेक्टरवर टरबुजांची लागवड झाली आहे. सध्या वातावरणात उन्हाची तीव्रता कमालीची वाढत असल्याने मालाचे नुकसान होत आहे. पारंपरिक पिके सोडून बहुतांश शेतकऱ्यांनी टरबुजांची लागवड केली होती. लागवडीपासून योग्य काळजी घेत टरबुजांचे उत्पादन हाती आले. मात्र, बाजारात अक्षरशः कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हताश झाले आहेत. शेतामधून बाजारात टरबूज विक्रीला आणल्यानंतर चक्क दोन रुपये किलोचा भाव व्यापाऱ्यांकडून मिळत असल्याचे वास्तव चित्र सध्या दिसत आहे.

Watermelon
जनावरे चोरणारे दोघे अट्टल जाळ्यात; 20पेक्षा जास्त गुन्हे दाखल

लागवडीचा खर्चही निघेना

चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे, दरेगाव, लोंढे, उंबरखेडे, चिंचगव्हाण, दहिवद, पिलखोड, टाकळी प्र. दे., दसेगाव, तिरपोळेसह इतरही अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी टरबुजांची लागवड केली होती. जवळपास ३०० हेक्टरवर लागवड झालेल्या टरबुजांना भावच नसल्याने त्यांच्या तोडणीसाठी देखील शेतकरी धजावत नाहीत. तालुक्यात चार वर्षांपासूनच टरबुजांची लागवड वाढली असून या पिकाकडे नगदी पीक म्हणून शेतकरी पाहतात. मागीलवर्षी टरबुजांना चांगला भाव मिळाला होता. त्या अपेक्षेने यंदा अनेकांनी लागवड केली. मात्र, यंदा आवक प्रचंड झाल्याने भाव टरबुजांचे भाव कमालीचे गडगडले आहेत.

गल्लोगल्ली होतेय विक्री

व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात टरबुजांची खरेदी करीत असल्याने काहींनी तर हजारो रुपयांचे टरबूज अक्षरशः फेकून दिले आहेत. १५ ते १७ रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या टरबुजांना यंदा २ ते ३ रुपये किलोचा दर मिळत आहे. काही शेतकऱ्यांनी तर खेड्यांसह शहरांमध्ये गल्लोगल्ली जाऊन स्वतःच टरबूज विक्री करण्याचा फंडा वापरला आहे. चाळीसगाव शहरात ट्रॅक्टरसह इतरही वाहनांमध्ये पाच ते दहा रुपये किलो दराने टरबूज विकले जात आहेत. काही शेतकरी १० ते ३० रुपये नगाप्रमाणे टरबुजांची विक्री करीत आहेत.

Watermelon
ग्रामसेवकासह सरपंचपचास 6 हजारांची लाच भोवली

दोन एकर टरबुजांवर फिरवला नांगर

महाराष्ट्रातील टरबुजांना विशेषतः गुजरात राज्यात चांगली मागणी असते. या मागणीनुसार, रमजान महिन्यापर्यंत चांगला दर मिळाला. त्यानंतर मात्र भाव कमालीचे गडगडल्याने आणि वाढत्या उन्हामुळे टरबुजांना शेतातच भेगा पडून ते खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. काही शेतकऱ्यांच्या टरबुजांवर ‘व्हायरस’ही आल्याचे दिसून येत आहे. एकूणच हे सर्व होणारे नुकसान असह्य होत असल्याने दसेगाव (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी सागर राजपूत यांनी तर आपल्या दोन एकर क्षेत्रावरील टरबुजांवर नांगर फिरवला. टरबुजांवर केलेला सत्तर हजारांचा खर्च वाया गेल्याची खंत शेतकरी श्री. राजपूत यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com