Jalgaon Inspirational News : दहावीची विद्यार्थिनी आपल्या चित्रप्रदर्शनाची रक्कम देणार सामाजिक संस्थांना!

Shanaya Vasistha and Namrata Vasistha along with the painting exhibition.
Shanaya Vasistha and Namrata Vasistha along with the painting exhibition.esakal

Jalgaon Inspirational News : येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी शनया वसिष्ठ पहिल्या चित्रप्रदर्शनातील रक्कम राष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य करणाऱ्या तीन संस्थांना देणार आहे, अशी माहिती चित्रकार शनया वसिष्ठ, तिचे वडील शंतनू वसिष्ठ व आई नम्रता वसिष्ठ यांनी दिली. (Shanaya Vasistha will donate the proceeds of her painting exhibition to social organizations jalgaon inspirational news)

रिंग रोडवरील पी. एन. गाडगीळ आर्ट गॅलरीत ‘रत्न चित्रावली’ या प्रदर्शनानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गेल्या पाच वर्षांपासून शनयाची चित्रसाधना सुरू असून, गुरू तरुण भाटे यांच्या मार्गदर्शनात तिने भारतरत्न पुरस्कारप्राप्त २५ व्यक्ती, ऑस्कर पुरस्कारप्राप्त दोन भारतीय विजेत्यांच्या चित्रांसह काढलेली विविध चित्रे प्रदर्शनात ठेवली आहेत. उद्योगपती अशोक जैन यांनी अनुभूती शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, म्हणून ही चित्रे खरेदी केली आहेत, असे शंतनू वसिष्ठ यांनी सांगितले.

पुणे येथील सीए विनीत देव यांनी शनयाला वेळोवेळी प्रोत्साहन दिले असून, क्रिकेटपटू केदार जाधव व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचे एकत्रित चित्र शनयाने काढले व श्री. देव यांच्या उपस्थितीत ते चित्र केदार जाधव यांना भेट दिले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Shanaya Vasistha and Namrata Vasistha along with the painting exhibition.
Lok Sabha Election : हरियाणाहून 5490 VV Pat यंत्रे दाखल; जाणून घ्या काय आहे व्हीव्ही पॅट मशीन?

शनया वसिष्ठ हिने सांगितले, की अनेक विद्यार्थिनी शिक्षण घेताना मूलभूत सुविधांपासून वंचित असतात. त्या गरीब मुलींना आधार द्यावा, थोडी मदत करता यावी, अशी कल्पना माझ्या मनात आली. त्यासाठी प्रदर्शनातील रक्कम द्यावी, या माझ्या कल्पनेला माझ्या पालकांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी चांगल्या संस्थांची निवड करून दिली आहे. क्राय, उमंग फाउंडेशन, आय इम्पॅक्ट या तीन नावाजलेल्या प्रतिष्ठित संस्थांना आम्ही ही रक्कम देणार आहोत.

दरम्यान, दहावीचे वर्ष असूनही शनयाने लखनऊ येथील झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही शाळेच्या टीममध्ये सहभागी होत सात ट्रॉफी मिळविल्या आहेत. या स्पर्धेत ४० देशातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. शनाया हिचे चित्रप्रदर्शन १५ एप्रिलपर्यंत बुधवार वगळता सकाळी ११ ते रात्री आठपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

Shanaya Vasistha and Namrata Vasistha along with the painting exhibition.
Jalgaon Postal Court : तक्रारींच्या निराकरणासाठी जळगावात 'या' तारखेला डाक अदालत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com