Latest Marathi News | पाचोरा येथील शतायूची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pachora: Dinesh Bothra, Girish Kulkarni, Jeevan Jain, Ritesh Lalvani, Sanjay Badola etc. while honoring Shatayu Kulkarni at Jayakiran Prabhaji School.

Jalgaon News : पाचोरा येथील शतायूची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

पाचोरा : येथील जयकिरण प्रभाजी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी शतायू संदीप कुलकर्णी याची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे.

बीसीसीआय अंतर्गत विजय मर्चंट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत सोळा वर्षे आतील संघात शतायु कुलकर्णी सहभागी झाला. महाराष्ट्र संघाकडून खेळताना त्याने पाच सामन्यांमध्ये २२ बळी घेण्याचा विक्रम केला. (Shatayu from Pachora Selection in Maharashtra Cricket Team jalgaon sports news)

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

हेही वाचा: Nashik News:...अन् दुकानावर नायलॉन मांजा बंदीचे फलक झळकले! विक्रेत्यांवर तिसरा डोळा

तसेच जे बळी घेतले ते निर्णायकप्रसंगी घेऊन उत्कृष्ट व तंत्रशुद्ध खेळाचे प्रदर्शन केले. या कामगिरीमुळे त्याची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली असून, तो पुढील सामने खेळण्यासाठी चेन्नई येथे रवाना झाला आहे.

शतायूच्या या यशाबद्दल जयकिरण स्कूलच्यावतीने त्याची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली व शाळेत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, गिरीश कुलकर्णी, जीवन जैन, संजय बडोला, जगदीश खिलोशिया, लालचंद केसवानी, रितेश ललवाणी, संजय चोरडिया, मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील, अतुल चित्ते आदी उपस्थित होते. स्वरूप पाटील यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. शतायू यास सूर्यकांत देवराज, निवृत्ती तांदळे या क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

हेही वाचा: Nashik News : अवघ्या 13 वर्षाच्या ओम ने केली 3800 कि.मी.ची नर्मदा परिक्रमा सायकलवर पूर्ण

टॅग्स :CricketJalgaonsports