Motivational Story : गतिमंदांसाठी ‘ती’ ठरलीय ‘मदर तेरेसा’

Naari Shakti
Naari Shaktiesakal

जळगाव : आपल्या गतिमंद मुलाचा आयुष्यभरासाठी सांभाळ केला पाहिजे, त्याचबरोबर इतरांची अशी मुले असतील त्यांचाही सांभाळ करायचा असे ध्येय बाळगत, ‘स्त्रीशक्ती’ आपल्या गतिमंद मुलासाठी काय करू शकते याचा प्रत्यय जळगाव येथील ‘आश्रय माझे घर’च्या संचालिका रेखा पाटील यांच्या लोकोपयोगी समाजकार्यातून समोर आला आहे.

मानसिक अपंगत्व (मतिमंद व गतिमंद) असलेल्या मुलाचा सांभाळ कसा होईल, त्यात पतीचेही निधन झाले. सासरची मंडळी उच्चशिक्षित, धनाढ्य असताना त्यांनी पतीच्या निधनानंतर ‘आमचा होता तो गेला, आता तू तुझे व मतिमंद’ मुलाचे पाहून घे’ असे सांगत घरातून बाहेर काढले, पतीच्या संपत्तीतूनही बेदखल केले गेले, असे एकापेक्षा अनेक अन्याय सहन केले.

केवळ एकटीने मतिमंद मुलांचा सांभाळ करणे शक्य होणार नाही, यामुळे जळगावमधील समदुःखी असलेल्यांना एक ग्रुप करीत त्यांच्याही गतिमंद पाल्यांना आयुष्यभरासाठी सांभाळण्याचा विडाच त्यांनी उचलला. त्या गतिमंद मुलांच्या ‘मदर तेरेसा’ ठरत आहेत. (She has become Mother Teresa for disabled jalgaon news)

Naari Shakti
Shardiya Navratri 2022 : नवसाला पावणारी कुलस्वामिनी म्हाळसा देवी

केशव स्मृती प्रतिष्ठानच्या ‘आश्रय माझे घर’च्या या उपक्रमाला अनेकांचे सहकार्य आहे. अध्यक्ष डॉ. प्रताप जाधव, सचिव अमित पाठक आदींचे आश्रय माझे घराला मोलाची मदत आहे. संचालिका रेखा पाटील यांचा विवाह पुण्यात उच्चशिक्षित, धनाढ्य कुटुंबात झाला. विवाहानंतर पहिला मुलगा झाला. तो दिव्यांग असल्याची जाणीव तिसऱ्या वर्षी झाली. दुर्दैवाने २००९ मध्ये रेखा पाटील यांच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनाच्या दिवशीच सासरच्यांनी ‘आमचा होता तो गेला, आता तू तुझे व गतिमंद’ मुलाचे पाहून घे’ असे सांगत घरातून बाहेर काढले.

याच काळात त्यांच्या गतिमंद मुलाला ३५ दिवस रुग्णालयातील आयसीयूत ठेवण्यात आले. डॉक्टरांनी मुलगा राहणार नसल्याचा इशारा दिला होता. त्याला न्यूमोनिया, स्वाइन फ्लू झाला. पुण्यातील अनेक जण मुलाला पाहायला आले, तब्येतीची विचारपूस केली. मात्र सासरची मंडळी उच्चशिक्षित असूनही पाहायला आली नाही. सुदैवाने मुलगा बरा झाला. सासरच्यांच्या छळानंतर रेखा पाटील माहेरी (जळगावला) आल्या. त्याही उच्चशिक्षित असल्याने नोकरी केली.

Naari Shakti
शिकागो महोत्सवात मराठीचा डंका! परेश मोकाशीचा 'वाळवी' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

मानसिक अपंग असलेल्या मुलांचा सांभाळण्याचा प्रश्‍न होताच. अशा मुलांसाठी आपण संस्था स्थापन करून त्यांचा आयुष्यभर सांभाळ करू शकू, असा संकल्प त्यांनी केशव स्मृती प्रतिष्ठानच्या संचालकांना सांगितला. ज्यांची मुले मानसिक अपंग आहेत अशा पालकांचा शोध घेतला असता अनेक पालक मिळून आले. त्यांचा एक ग्रुप करीत आश्रय माझे घराची निर्मिती झाली. आज २५ मानसिक दिव्यांग मुले आश्रय माझे घरात आहेत. या मुलांचे भावविश्‍व वेगळेच असते. घरात ती अबनॉर्मल असतात.

स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न आश्रय माझे घरात अशा मुलांचा सांभाळ केला जातो. त्यांच्याशी त्यांच्या वयाचे होऊन बोलावे लागते, त्यांना स्वतःचे कपडे घालणे, जेवण करणे, स्वतःची कामे स्वतः करणे, अगरबत्ती, फुले तयार करणे, शोच्या वस्तू तयार करणे आदी शिकविले जाते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. ही मुले एक जीव आहे. ती काही मोठी कामे करून संसार करू शकत नाहीत, त्यांचे वेगळेच विश्‍व असते. त्या विश्‍वात ती रमतात. त्यांना आनंदी ठेवण्याचा वसा रेखा पाटील यांनी घेतला आहे. औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, दिल्ली आदी ठिकाणची मानसिक दिव्यांग, गतिमंद मुले येथे आहेत.

Naari Shakti
शिकत असतानाच मिळवा ‘जॉब ऑफर’ ‘रिअल इस्टेट मार्केटिंग अँड मॅनेजमेंट’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमांद्वारे घडवा करिअर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com