Shardiya Navratri 2022 : नवसाला पावणारी कुलस्वामिनी म्हाळसा देवी

Mhalsa Devi
Mhalsa Devi esakal

अमळनेर : मांडळ (ता. अमळनेर) येथील गावांतील तसेच तालुक्यातील भाविकांना नवसाला पावणारी कुलस्वामिनी म्हाळसा देवीचे एक जागृत देवस्थान बनले आहे. या देवीची स्थापना १९९५  मध्ये करण्यात आली असून, अल्पावधीतच या देवीच्या आजूबाजूचा परिसर नैसर्गिक रूपाने गजबजू लागला आहे. शिरसाठ परिवारातील भाविकांची ही देवी कुलस्वामिनी असून, जवळजवळ पंधराशे ते सोळाशे पूजक  या कुलस्वामिनीचे नित्य नियमित या गावांतील आहेत. तसेच चौबारी, लोंढवे, वालखेडा, डांगरी व इतर  तालुक्यातील भाविक नवरात्र व दसरा या कालावधीत या देवीच्या दर्शनासाठी येत असतात.

या देवीच्या परिसरातील निसर्गरम्य वातावरण असल्याने ७० ते ८०  वेगवेगळ्या प्रकारची झाडे या परिसराची शोभा वाढवून देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना आकर्षित करतात. या देवीच्या सभामंडपाच्या कामासाठी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी दहा लाखाचा निधी दिला होता. तसेच विद्यमान आमदार अनिल पाटील यांनी देवीच्या सभामंडपासाठी २० लाख निधी दिला आहे.(Kulaswamini Mhalsa Devi at Mandal Shardiya Navratrotsav 2022 Jalgaon News)

Mhalsa Devi
Cyber Crime Case : आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाऊंट हॅक !

उपसभापती भिकेश पाटील यांनी भाविकांना बसण्यासाठी बाक तर माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील, माजी सभापती आशा ठाकरे तसेच संदीप पाटील यांनी येथील कॉंक्रिटीकरणासाठी मदत केली होती. तसेच या गटातील जिल्हा परिषद सदस्या संगीता भिल यांनी लाईटसाठी निधी दिला होता. अशाप्रकारे अनेक भाविक येथील देवस्थानाला सरळ हाताने मदत करत असतात. आजपर्यंत या देवीच्या साक्षीने गावांतील हजारो लग्नसोहळे झाले असून, अनेक भागवत कथांचे आयोजन करण्यात आले आहे. या देवीच्या परिसरातील बोअरवेल असून, उन्हाळ्याच्या दिवसातही येथील परिसर हिरवागार असतो. नवरात्रीच्या दिवसात हा देवीचा परिसर रोषणाईने सजविण्यात आलेला असतो.

Mhalsa Devi
jalgaon : आठवडेबाजाराचा भाजीपाला पडला महागात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com