Jalgaon News : श्रीरामरथ वहनोत्सवास उद्यापासून प्रारंभ; 11 दिवसांच्या वहनानंतर रथोत्सव

ram rath
ram rath esakal
Updated on

Jalgaon News : नगरीचे ग्रामदैवत असलेल्या जुन्या जळगावातील श्रीराम मंदिर संस्थानतर्फे यंदाही कान्हदेशचे सांस्कृतिक वैभव श्रीराम रथोत्सव साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सलग अकरा दिवस चालणारा श्रीरामरथ वहनोत्सव मंगळवारी बलिप्रतिदेपासून (ता. १४) सुरू होत आहे.

दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या श्रीराम व श्रीवहनोत्सवाला कान्हदेशात विशेष महत्त्व आहे.(Shri Ram Rath Vahanotsava starts from tomorrow in jalgaon news )

वारकरी संप्रदायाचे थोर संत आप्पा महाराज यांनी हा उत्सव सुरू केला आणि तो आता या प्रांताचे वैभव बनला आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून (बलिप्रतिपदा) एकादशीपर्यंत हा उत्सव चालतो. सलग दहा दिवसांच्या वहनांनंतर एकादशीला श्रीरामरथोत्सव साजरा केला जातो.

द्वादशीला रासक्रीडेच्या वहनाने या उत्सवाची सांगता होते. यंदा या वहनोत्सवाला मंगळवार (ता. १४)पासून सुरवात होत आहे. १४ ते २२ नोव्हेंबर विविध प्रकारची वहने निघून उत्सव साजरा होईल. २३ नोव्हेंबरला एकादशीला श्रीराम रथोत्सव होऊन २४ तारखेस रासक्रीडेचे वहन निघेल.

ram rath
Jalgaon News : अमळनेर तालुक्यात शेडनेटचा कोट्यवधींचा घोटाळा : सचिन पाटील

असा असेल वहनोत्सव

तिथी------------ तारीख-----वहन

कार्तिक शु. प्रतिपदा--१४ नोव्हें.-- घोडा (अश्‍व)

कार्तिक शु. द्वितीया---१५ नोव्हें.---हत्ती (ऐरावत)

कार्तिक शु. तृतीया--- १६ नोव्हें.---वाघ

कार्तिक शु. चतुर्थी----१७ नोव्हें.---सिंह

कार्तिक शु. पंचमी-----१८ नोव्हें.----श्री सरस्वती

कार्तिक षष्ठी/सप्तमी-----१९ नोव्हें.---- श्री चंद्र

कार्तिक शु. अष्टमी--- २० नोव्हें.---- सूर्यनारायण

कार्तिक शु. नवमी----२१ नोव्हें.-----गरुडराज

कार्तिक शु. दशमी-----२२ नोव्हें.---- श्री मारुतीराय

कार्तिक शु. एकादशी---२३ नोव्हें.----- श्रीराम रथोत्सव

कार्तिक शु. द्वादशी----२४ नोव्हें.----- रासक्रीडा

ram rath
Jalgaon News : शासकीय कार्यालये 5 दिवस बंद राहणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com