दीडशतकी परंपरेचा श्रीराम रथोत्सव आज | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीडशतकी परंपरेचा श्रीराम रथोत्सव आज

जळगाव : दीडशतकी परंपरेचा श्रीराम रथोत्सव आज

जळगाव : कोरोनामुळे गेल्यावर्षी श्रीराम रथोत्सव उत्सव म्हणून साजरा होऊ शकला नव्हता, तो यंदा मर्यादित स्वरुपात साजरा होणार आहे. सोमवारी कार्तिकी एकादशीनिमित्त रथाची मिरवणूक निघेल.

या उत्सवानिमित्त श्रीराम मंदिर संस्थानतर्फे गेल्या दहा दिवसांपासून वहनोत्सव सुरु आहे. रथोत्सवाचे हे १४९वे वर्ष आहे. सोमवारी (ता.१५) पहाटे ४ वा. काकडारती, प्रभु श्रीरामांच्या उत्सवमूर्तीस महाभिषेक, सकाळी ७ वा. महाआरती, ७.३० ते ८.३० सांप्रदायिक पंचपदी भजन, तर मंदिराच्या प्रांगणात सकाळी १०.३० वा. गादीपती हभप मंगेशमहाराज जोशी यांच्याहस्ते विधीवत रथाचे पूजन होईल.

हेही वाचा: राष्ट्रीय अकादमीचे प्रमुख लक्ष्मण होणार; सौरव गांगुली

ब्रह्मवृंदाच्या वेदमंत्रोच्चारात होणाऱ्या या सोहळ्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहामौर कुलभूषण पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त सतीश कुळकर्णी, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, यांच्याह जिल्ह्यातील आमदार- खासदार आदी उपस्थित राहतील.

loading image
go to top