
चांदीच्या दरात पुन्हा 3 हजारांची घसरण; सोनेही घसरले
जळगाव : अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला चांदीच्या दरात चार हजारांची घसरण झाली होती. ६९ हजारांवरून ६५ हजारांपर्यत चांदीचे दर गडगडले होते. आज आठ दिवसांनी चांदीच्या दरात पून्हा तीन हजारांची घसरण झाली आहे. ६५ हजारांपर्यत असलेली चांदी ६२ हजारांवर येवून ठेवली आहे. सोन्याचे दर ५२ हजार (प्रतीतोळा) होते तेही ५१ हजारांपर्यंत खाली आले आहेत. (Gold Silver rate updates)
गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी
दर घसरल्याने सोने, चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अधिकच चांगली संधी उपलब्ध झाली आहे. गेल्या आठ दिवसात चांदीच्या दरात ६५ हजारांवरून ६२ हजारांपर्यत घसरण झाली आहे. तर सोन्याच्या दर ५२ हजारावरून ५१ हजारावर आले. सोन्याच्या दरात एक हजारांची घसरण झाली. अक्षय तृतीयेला सोन्याला चांगली मागणी होती. यामुळे कोट्यावधीची उलाढाल झाली होती.
हेही वाचा: राज्यातील शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न सुटणार; शासनातर्फे निधी मंजूर
दोन महिन्यांपूर्वी रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात सातत्याने ८ मार्चपर्यंत वाढ होत गेली. नंतर मात्र युद्धात शिथिलता येताच सोने, चांदीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. मागील महिन्यात सोन्याच्या दरात २७०० ची तर चांदीच्या दरात २ हजारांची घसरण झाली होती. युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात तीन ते चार हजारांची वाढ झाली होती. चांदीच्या दरात नऊ हजारांची वाढ झाली होती. याचा फायदा अनेक गुंतवणूकदारांनी घेतला. सोन्या- चांदीची मोड विकून नफा कमविला आहे.
सोने, चांदीचे दर असे (जीएसटी विना)
तारीख--सोने (प्रतितोळे)--चांदी (प्रतिकिलो)
२२ एप्रिल--५२ हजार ८००--६९ हजार
२३ एप्रिल--५२ हजार ७००--६९ हजार
२६ एप्रिल--५२ हजार--६८ हजार
२७ एप्रिल--५२ हजार ७००--६९ हजार
३० एप्रिल--५२ हजार ३५०--६५ हजार
१ मे----५२ हजार--६७ हजार
६ मे----५१ हजार ७००--६५ हजार
७ मे----५२ हजार --६५ हजार
९ मे----५१ हजार ८००--६५ हजार
१० मे----५१ हजार--६२ हजार
हेही वाचा: 3 स्टार हॉटेलात 2 महिने जेवणासह रिचवली दारू; पैसे मागताच पसार
Web Title: Silver And Gold Prices Fall Rate Updates
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..