जळगाव : चांदीच्या दरात तीन दिवसांत २ हजार ५०० रुपयांनी वाढ

दिवसभरात होतेय १६० किलोची विक्री
silver
silversakal
Updated on

जळगाव : आगामी काळात चांदीचे दर प्रतिकिलो एक लाखाच्यावर जाणार असल्याचा अंदाज सोने बाजारात व्यक्त केला जात असल्याने चांदीच्या दरात वाढ होणे सुरू झाले आहे. तीन दिवसांपूर्वी चांदीचा दर प्रतिकिलो ६४ हजार रूपये होता. आज तो ६६ हजार ५०० रूपयांपर्यंत गेला आहे. दरम्यान, यापूर्वी रोज पन्नास ते साठ किलो विकली जाणारी चांदी आता रोज दीडशे ते एकशेसाठ किलोपर्यंत विकली जात आहे.

silver
Uttarakhand Election : मंत्री रावत यांची काँग्रेसमध्ये वापसी

अनेक नागरिक गुंतवणुक म्हणून सोने, चांदीकडे पहातात. दर कमी झाले की सोने-चांदी घेतात आणि भाव वाढले की विकतात. यामुळे खरेदी-विक्री दरतील फरक म्हणजे त्यांचा नफा, असे गुंतवणूकदारांचे गणित असते. काही दिवसांपासून चांदीचे दर एक लाख प्रतिकिलो जातील, असा अंदाज सोने बाजाराने वर्तविला आहे. यामुळे नागरिकांकडून चांदीला मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. शहरासह जिल्ह्यातील सराफी दुकानांत अचानक चांदीला मागणी वाढली असल्याचे सांगण्यात आले. सध्या चांदीचा दर ६६ हजार ५०० प्रतिकिलो आहे. दोन दिवसांपूर्वी चांदी ६४ हजार प्रतीकिलो अशी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Khandesh Expressway latest update
ACB Nashik bribery trap operation
Maharashtra cotton sowing delayed due to low rainfall
Why are electric vehicles becoming popular in Maharashtra?
Marathi News Esakal
www.esakal.com