Solar Eclipse 2022 : खंडग्रास सूर्यग्रहणाची आज खगोलीय अद्‌भुत घटना | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solar eclipse

Solar Eclipse 2022 : खंडग्रास सूर्यग्रहणाची आज खगोलीय अद्‌भुत घटना

जळगाव : दिवाळीच्या आनंदोत्सव आणि दीपोत्सवात मंगळवारी (ता. २५) सूर्यास्तावेळी खंडग्रास सूर्यग्रहण या अद्‌भुत घटनेचे साक्षीदार होण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. जळगावात सूर्यास्ताच्या सव्वा तास आधी सूर्यग्रहण बघता येणार आहे.

भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून हे खंडग्रास सूर्यग्रहण बघायला मिळणार आहे. (Solar Eclipse 2022 today astronomical phenomenon of Continental Solar Eclipse jalgaon Latest Marathi News)

जळगावात सायंकाळी सव्वा तासाचा काळ

जळगावातून हे ग्रहण २५ टक्के दिसणार आहे. सायंकाळी चार वाजून ४६ मिनिटांनी ग्रहणाची सुरवात होईल. पाच वाजून ४० मिनिटांनी सूर्यबिंब २५ टक्के झाकलेले असेल. त्यानंतर ग्रहण सुटायला सुरवात होईल आणि पाच वाजून ५७ मिनिटांनी ग्रहणातच सूर्यास्त होईल. साधारण एक तास दहा मिनिटे आपल्याला ग्रहण दिसणार आहे. हे खंडग्रास सूर्यग्रहण असल्याने सर्व ठिकाणी हे कमी-अधिक प्रमाणात खंडग्रास स्वरूपातच दिसणार आहे.

भारतातून दिसणारे हे शेवटचे सूर्यग्रहण आहे. यानंतर २ ऑगस्ट २०२७ ला खंडग्रास सूर्यग्रहण आहे. पण त्या वेळी पावसाळा असल्याने दिसण्याची शक्यता कमी आहे.

"हे ग्रहण सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी असल्याने शहरातून इमारती आणि झाडांमुळे नीट बघता येणार नाही. यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे जैन हिल्स परिसरातील अनुभूती शाळेजवळील महावीर पॉइंट या उंच ठिकाणी सूर्यग्रहण अभ्यासण्याचा उपक्रम ठेवण्यात आलेला आहे. यूट्यूबच्या https://youtu.be/b27Snvu3LXQ या लिंकच्या माध्यमातून प्रक्षेपण बघता योईल. सर्वांनी कोणतेही समज-गैरसमज मनात न ठेवता या खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा आणि त्यामागचे विज्ञान समजून घ्यावे." - अमोघ जोशी, खगोल अभ्यासक

टॅग्स :Jalgaonsolar energy