Jalgaon News : दस्केबर्डी परिसरात पाटचारी कामाला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhujal Mission Team, Bhujal Warkari and villagers came to inspect the patch repair work

Jalgaon News : दस्केबर्डी परिसरात पाटचारी कामाला वेग

दस्केबर्डी (जि. जळगाव) : परिसरातील दस्केबर्डी, शिदवाडी खेडी, धामणगाव, पोहोरे, कळमडू या गावांमध्ये पाटचारी दुरुस्तीचे काम सुरू आहे. (Speed ​​up paving work in Daskebardi area jalgaon news)

येथे यपिरॉक मायनिंग इंडिया व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व अर्थसाह्याने भूजल अभियानासह शेतकरी सहभागातून प्रत्येक गावाने २०० लिटर डिझेल देऊन रोटेशन पद्धतीने पाटचारीचे काम करण्याचे ठरले.

त्याप्रमाणे सर्व गावांनी चांगले सहकार्य केले. त्यात दस्केबर्डी व शिदवाडी या गावांनी विशेष सहकार्य केले. राजमानेपासून दस्केबर्डी व शिदवाडी गावापर्यंत खूप वर्षानंतर पाणी पोहोचले असून, गावातील लोकांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Jalgaon News : तृणधान्यमुळे राहाल व्याधींपासून दूर; मान्यवरांनी सांगितले तृणधान्याचे महत्त्व

यासाठी भूजल अभियान टीमचे प्रमुख गुणवंत सोनवणे यांच्यासह त्यांची सर्व टीम, भूजल वारकरी, तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. लोक सहभागातून जवळपास १३ ते १४ किलोमीटरची पाटचारी दुरुस्त करण्यात आली.

हेही वाचा: Jalgaon Crime News : नगरदेवळा येथील शेतातून 28 क्विंटल कापूस लंपास

टॅग्स :Jalgaonworker