Jalgaon : बकालेंच्या अटकेसाठी पथक ठाण्यातच मुक्कामी

Kiran kumar Bakale
Kiran kumar Bakale

जळगाव : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या अटकेसाठी तपासपथक गेल्या तीन दिवसांपासून ठाणे शहरातच मुक्कामी आहे. पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात असल्याचे सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी माहिती देताना सांगितले.

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. बकाले यांचा जिल्‍हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मराठा समाजाच्या वतीने अटकेची तीव्र मागणी होत आहे. बकाले यांच्या शोधार्थ तपास पथक गेल्या तीन दिवसांपासून ठाणे येथे मुक्कामी असून मिळालेल्या प्रत्येक माहितीचा कसून तपास केला जात आहे.

गुन्ह्यातील सहाय्यक फौजदार अशोक महाजन याला सहआरोपी केल्यानंतर तोही बेपत्ता झाला आहे. दाखल गुन्ह्यात वाढीव कलम लावण्यात आले असून संशयितांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल असे, सहाय्यक पोलिस अधीक्षक चिंता यांनी सांगितले.(squad enter in thane for kirankumar bakale areested case jalgaon news)

Kiran kumar Bakale
साडेदहा लाखांचे दागिने चोरणारा जावई गजाआड; चावी चोरून केली घरफोडी

नोटीस घेण्यास नकार

पोलिसदलातर्फे घडल्या प्रकाराची खातेअंतर्गत चौकशी सुरु असून हजर राहण्यासाठी अशोक महाजन यांना तीन वेळेस नोटीस देण्यात आली. मात्र, त्यांनी स्वीकारण्यास नकार दिला. तर, बकाले यांच्या जळगावातील घराला नोटीस चिटकविण्यात आली असून त्यांना नाशिक येथे हजेरीच्या सूचना दिल्या असून तिथेही ते हजर राहत नाही.

मुख्य पुरावाच नष्ट करण्याचा प्रयत्न

दाखल गुन्ह्यात दोघांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप ज्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आली आणि तेथून ती व्हायरल झाल्यानंतर संबधीताचा मोबाईल हाच मुख्य पुरावा आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच अशोक महाजन याने मोबाईल हरवल्याची तक्रार दिली. बकालेंचा स्वतःचा पत्ता नसून त्याचाही मोबाईल बंदच आहे. तर, गुन्हेशाखे

तील बहुतांश कर्मचाऱ्यांनी स्वतःचे मोबाईलच बदलून टाकल्याची माहिती समोर येत आहे.

Kiran kumar Bakale
PFI प्रमाणेच RSS वरही याआधी तीनवेळा बंदी घालण्यात आली होती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com