SSC Board Exam : सर्वोदय केंद्रावर आढळला कॉपीचा गठ्ठा; कॉपीचा प्रकार पत्रकारांच्या सतर्कतेने उघड

ssc board exam bundle of solved answer sheets was found in Sarvodaya High School Centre jalgaon news
ssc board exam bundle of solved answer sheets was found in Sarvodaya High School Centre jalgaon newsesakal

भुसावळ (जि. जळगाव) : दहावीच्या (SSC) परीक्षेला गुरुवारपासून (ता. २) सुरवात झाली असून, भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील सर्वोदय हायस्कूलच्या केंद्र क्रमांक ३२४० केंद्रामध्ये खडका, साकरी, शिंदी, किन्ही हायस्कूलचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. (ssc board exam copy bundle of solved answer sheets was found in premises of Sarvodaya High School Centre jalgaon news)

दरम्यान, गुरुवारी (ता.२) सकाळी अकराला मराठी विषयाची प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांना वाटप झाल्यानंतर अर्धा तासानंतर सर्वोदय हायस्कूल केंद्राच्या आवारात कर्मचाऱ्याकडे उत्तरपत्रिका सोडविलेल्या प्रतींचा गठ्ठा आढळून आला.

संगनमत करून उत्तरपत्रिका संच शाळेत सोडवून शाळेतील कर्मचाऱ्यास दुचाकीने बाहेर पाठवून पाचशे प्रती फोटोकॉपी काढून विद्यार्थ्यांना पुरवठा करण्याच्या उद्देशाने शाळेत घेऊन जाताना पत्रकारांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. गटशिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटनास्थळी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती किशोर वायकोळे यांना पाठवून कारवाईचे आदेश दिले.

किन्ही येथे सर्वोदय हायस्कूलमध्ये दहावी परीक्षेसाठी केंद्र क्रमांक ३२४० आहे. या केंद्रात खडका, साकरी, शिंदी, किन्ही हायस्कूलचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

यामध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जास्तीत- जास्त गुण मिळावे, या उद्देशाने केंद्र क्रमांक ३२४० मध्ये आलेले केंद्रप्रमुख व तसेच सर्वोदय हायस्कूल किन्ही कायम परीक्षा केंद्र राहावे, या अनुषंगाने प्रत्येक ब्लॉकमधील विद्यार्थ्यांना टेबलपर्यंत कॉपी पोचविण्यासाठी शाळेतील कर्मचारी उत्तरपत्रिका संच बाहेरून पाचशे प्रति फोटोकॉपी काढून विद्यार्थ्यांना पुरवठा करण्याच्या उद्देशाने शाळेत घेऊन जाताना पत्रकारांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

ssc board exam bundle of solved answer sheets was found in Sarvodaya High School Centre jalgaon news
Shinde Vs Thackeray | चिन्ह पक्ष चोरणाऱ्या गद्दारांना..... : संजय सावंत

दरम्यान, फोटोकॉपीच्या प्रति शाळेत घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यास मुख्याध्यापकांच्या कार्यालयाबाहेर दुचाकी लावताना पत्रकारांनी पकडले. यावेळी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे उपस्थित होते. श्री. शेंडे यांनी त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, असे सांगितले असता सर्वोदय हायस्कूल किन्हीचे मुख्याध्यापकांना कार्यालयाच्या बाहेर बोलावून उत्तरपत्रिका सोडविलेल्या प्रतींचा गठ्ठा ताब्यात घेण्यास सांगितले.

"या घटनेसंदर्भात गटशिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांना कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले. पुढील चौकशीकामी उपशिक्षणाधिकारी एयाज शेख व गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे." - नितीन बच्छाव, गटशिक्षणाधिकारी (माध्यमिक)

"किन्ही (ता. भुसावळ) येथील सर्वोदय हायस्कूलच्या केंद्र क्रमांक ३२४० येथे गुरुवारी (ता. २) मराठी विषयाचा पेपर सुरू होता. घडलेल्या घटनेसंदर्भात प्रत्यक्ष भेट दिली असता केंद्र संचालकांच्या टेबलावर कागदाचा रीम, रॅपरमध्ये कॉपी, साहित्य ठेवलेले होते. सोबत बैठे पथक श्रीमती दवे उपस्थित होत्या." - किशोर वायकोळे, गटशिक्षणाधिकारी

ssc board exam bundle of solved answer sheets was found in Sarvodaya High School Centre jalgaon news
G S Society Linking Shares : ग स सोसायटीचे लिंकिंग शेअर्स व्याजासह परत करा; न्यायालयाचा दणका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com