ST Bus Ticket : एसटी प्रवासात काढा यूपीआय, क्यूआर कोडद्वारे तिकीट; जळगाव विभागात सुविधा सुरू

ST bus ticket ticket through UPI QR code jalgaon news
ST bus ticket ticket through UPI QR code jalgaon newsesakal

ST Bus Ticket : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करताना सुट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहकांत नेहमीच वाद होतात. परंतु आता सुट्या पैशांची किटकिट मिटली असून, एसटीतून प्रवास करताना डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट काढता येणार आहे.

सर्व वाहकांसाठी नवी अँड्रॉइड तिकीट इश्यू यंत्रे (एटीआयएम) दाखल झाली असून, नव्या मशिनमुळे प्रवाशांना यूपीआय किंवा क्यूआर कोडद्वारे पेमेंट करता येणार आहे. (ST bus ticket ticket through UPI QR code jalgaon news)

आजच्या डिजिटल युगात बाजारात खरेदी करताना ऑनलाइन पेमेंटची सुविधा सर्वच ठिकाणी उपलब्ध आहे. यामुळे क्षणात पेमेंट करून व्यवहार केले जातात. ही ऑनलाइन पेमेंटची प्रणाली आता राज्य परिवहन महामंडळानेही अमलात आणली आहे.

यामुळे बसमधून प्रवास करताना प्रवाशांना तिकिटासाठी सुट्या पैशांची चिंता करायची गरज नाही. वाहकांसाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशिन्स (ETIM) नव्याने सेवेत दाखल केले आहे. नव्या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी यूपीआय, क्यूआर कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येणार आहे.

ST bus ticket ticket through UPI QR code jalgaon news
Jalgaon News: विमानसेवेने अर्थकारण बदलणार, मार्गाचे अडथळेही हटवा; माजी महापौरांचे आयुक्तांना पत्र

फोन पे, गुगल पेद्वारे पेमेंट शक्य

एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी फोन पे, गुगल पे यांसारख्या यूपीआय पेमेंटसाठी वाहकाकडे असलेल्या अँड्राईड तिकीट मशिनवर असलेल्या क्यूआर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे. अर्थात, प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत म्हणून एसटीने प्रवास करणे टाळणे, तसेच सुट्या पैशांसाठी वाहकासोबत होणारा विनाकारण वाद असे प्रश्न कायमचे मिटू शकतात.

जळगाव विभागात १८०० मशिन

एसटी महामंडळाने अँड्रॉइड तिकीट इश्यू मशिन्स (ETIM) ही सुविधा सुरू केली असून, त्यानुसार प्रत्येक विभागात हे मशिन उपलब्ध करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव विभागातही एक हजार ८०० मशिन उपलब्ध करून देण्यात आले असून, यूपीआय व क्यूआर कोडद्वारे तिकीट उपलब्ध करून देण्याची सुविधा ११ डिसेंबरपासून सुरू करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी ‘सकाळ’ला दिली.

ST bus ticket ticket through UPI QR code jalgaon news
Jalgaon News: रेल्वे ‘चेन पुलिंग’च्या 8 महिन्यांत 3200 घटना; भुसावळ विभागात सर्वाधिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com