...तर एसटी महामंडळाला खासगीकरणाशिवाय पर्याय नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gulabrao patil

...तर एसटी महामंडळाला खासगीकरणाशिवाय पर्याय नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप मागे घ्यावा, अन्यथा शासनाला खासगीकरणा-शिवाय पर्याय नसेल, अशा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी (ता. २०) दिला आहे. रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन झाल्यानंतर ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देत होते.

बारा दिवस झाल्यानंतरही एसटी कर्मचारी संपावर आहेत. न्यायालयाने त्यांना कामावर हजर होण्याचे आदेश दिले तरी ते हजर होत नाही. असे विचारल्यावर पालकमंत्री पाटील म्हणाले, की दिवाळीच्या ऐन सिझनमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. हे अत्यंत चुकीचे आहे. संप करणे त्यांचा हक्क आहे. असे असले तरी एन सणासुदीच्या दिवसात प्रवाशांना वेठीस धरले गेले आहे.

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

कोरोनोच्या काळात तब्बल दीड वर्ष महाराष्ट्र शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना घरपोच पगार दिला. याची जराशी जाणीव कर्मचाऱ्यांनी ठेवायला हवी होती. एसटी महामंडळाला बारा हजार कोटींचा तोटा आहे. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय तोट्यातच करावा लागतो. शासनतेही सहन करीत आहे. आता जर संप मिटला नाही तर एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी जराही विलंब न लावता कामावर हजर व्हावे.

loading image
go to top