विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरू कराव्यात | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘यिन’ तर्फे विभाग नियंत्रकांना निवेदन

जळगाव : विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरू कराव्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोना व दिवाळीनंतर महाविद्यालये सुरू झाले असून सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्यासाठी वाहन उपलब्ध नाही. त्यामुळे किमान विद्यार्थ्यांसाठी बसच्या फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी सकाळ समूहाच्या ‘यिन’ व्यासपीठातर्फे करण्यात आली आहे.

यासंदर्भात ‘यिन’च्या जळगाव जिल्ह्यातील सदस्यांनी विभाग नियंत्रक, आगारप्रमुखांना निवेदन दिले. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत व संलग्न अशी शंभराहून अधिक महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये ५० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनामुळे बंद असलेली महाविद्यालये सोमवारपासून (ता.१५) नियमितपणे सुरू झाली आहेत.

हेही वाचा: परिवहन मंत्र्यांच्या बंगल्यावर संप फोडण्यासाठी खलबतं

मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विशेषत: तालुका व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आधीच शैक्षणिक नुकसान होत असताना विद्यार्थ्यांना बससेवा उपलब्ध नसल्याने त्यांचे अधिकच नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा सकारात्मक विचार करून आपण ज्या गावात, तालुका व शहरांच्या ठिकाणी महाविद्यालये आहेत अशा ठिकाणी तातडीने महाविद्यालयीन वेळेनुसार बससेवा उपलब्ध करून द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी यिन अधिकारी ॲड. सुकन्या कुळकर्णी, माजी अध्यक्षा दिव्या पाटील आदी उपस्थित होते.

loading image
go to top