Jalgaon News : रेल्वेतर्फे शिवाजीनगरकडून फुट ब्रिज खुला; शहरासह ग्रामीण नागरिकांची सुविधा

stairs open for railway station jalgaon news
stairs open for railway station jalgaon newsesakal

Jalgaon News : शिवाजीनगर भागातून रेल्वेस्थानकाच्या तिकीट खिडकीच्या भागाकडे नागरिकांना येण्यासाठी रेल्वेने नवीन जीना (फूट ओव्हर ब्रिज) जनतेसाठी बुधवार (ता. २४)पासून तो खुला करण्यात आला आहे.

शिवाजीनगरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोरून या जीन्याचे प्रवेशद्वार आहे. (stairs open for railway station jalgaon news)

रेल्वेतर्फे शिवाजीनगर भागाकडे नवीन प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्यामुळे शिवाजीनगर भागाकडून रेल्वेस्थानकाच्या तिकीट खिडकीकडे जाण्यासाठी रस्ता बंद झाला होता. शिवाजीनगरातील महावीर जीनिंगसमोरील रेल्वे गेटने प्रवेश होता.

मात्र, त्या ठिकाणी रेल्वेने नवीन प्लॅटफार्म तयार करून रेल्वे लाईन टाकल्यामुळे नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून जावे लागत होते. त्यामुळे तिकीट घराकडे पायी जाण्यासाठी अत्यंत सर्कस करावी लागत होती. शिवाय शिवाजीनगरातून रेल्वेस्थानकाच्या पलीकडे जाण्यासाठीही नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.

रेल्वे जीन्याची मागणी

शिवाजीनगरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी रेल्वे जीना तयार करावा, अशी मागणी नागरिकांसह सामाजिक संघटनांनी केली होती. याबाबत रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम यांना निवेदनही दिले होते. जनतेच्या मागणीनुसार रेल्वे विभागाने शिवाजीनगर भागाकडे सात ते आठ महिन्यांत जीना पूर्ण केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

stairs open for railway station jalgaon news
Zero Shadow Day : जब... परछाई भी अपना साथ छोड दे..! जळगावकरांनी अनुभवला शून्य सावली दिवसाचा क्षण

जनतेच्या वापरासाठी खुला

शिवाजीनगरातील नागरिकांसाठी जीना बुधवारपासून खुला करण्यात आला. दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोरून नवीन बांधलेल्या पुलाखालून या जीन्यावर जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे. शिवाजीनगर पुलाच्या समांतर रस्त्याला लागूनच हा जीना असल्यामुळे थेट जीन्याजवळ वाहन जाऊ शकते. त्या ठिकाणी रिक्षा, तसेच वाहन थांबाचीही सुविधा आहे. यामुळे आव्हाने, काळनदा, ममुराबादसह शहरातील नागरिकांचीही चांगली सुविधा झाली आहे.

शिवाजीनगरकडील गेट बंद होणार

आता शिवाजीनगरकडून रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी महावीर जिनिंग, तसेच गेंदालाल मिल, हुडकोसमोरील दर्ग्याजवळ असलेले दोन्ही प्रवेशद्वार आता बंद करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी भिंत उभारण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागातर्फे सांगण्यात आले.

वाहन थांबा, बुकिंग ऑफीस होणार

जनतेच्या वापरासाठी खुला झालेल्या जिन्याजवळ शिवाजीनगर भागाकडे वाहन थांबा व तिकीट बुकींग ऑफीस करण्याचेही रेल्वेचे नियोजन आहे, अशी माहिती जळगाव रेल्वेस्थानकाचे अधीक्षक ए. के. अग्रवाल यांनी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विनायक पाटील यांनी दिली.

stairs open for railway station jalgaon news
CM Eknath Shinde : "मनपा संकुलातील गाळेधारकांना न्याय देऊ" मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com