Bhusawal- Pune Express रोज रात्री सुरू करा; सल्लागार समिती बैठकीत मागणी

Jalgaon: Officials of the committee present in the station advisory committee meeting.
Jalgaon: Officials of the committee present in the station advisory committee meeting.esakal

जळगाव : भुसावळ ते पुणेपर्यंत रोज रात्री एक्स्प्रेस सुरू करावी, उधना ते पाळधी ही मेमू गाडी जळगावपर्यंत वाढविण्यात अशी मागणी रविवारी (ता. २५) रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली.

रेल्वे स्टेशन सल्लागार समितीची जळगाव स्टेशन प्रबंधक यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीला डॉ. राधेश्याम चौधरी, दीपक साखरे, प्रकाश पंडित, आनंद सपकाळे, रेखाताई वर्मा, गणेश माळी, अशोक धूत, निशांत जोशी, मनोहर जाधव असे सर्व सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.

भुसावळ डीआरएम ऑफिसचे कमर्शिअल मॅनेजर अनिलकुमार पाठक, जळगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक ए. एम. अग्रवाल साहेब, आरपीएफ इन्स्पेक्टर पाटील, सी.टी.आय. काळे उपस्थित होते. (Start Bhusawal Pune Express every night Demand in station advisory committee meeting jalgaon news )

Jalgaon: Officials of the committee present in the station advisory committee meeting.
Jalgaon Crime : विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह तिघांवर गुन्हा

जळगाव स्टेशनवरील समस्या सर्व समिती सदस्यांनी मांडल्या. यात जळगाव रेल्वे स्टेशनवरील स्वच्छता, स्टेशनवर सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्याबाबत चर्चा करण्यात आली. जळगाव रेल्वे स्टेशनवर तत्काळ आरक्षण तिकीट खिडकी सुरू करण्यासाठी विनंती करण्यात आली. तसेच जळगाव रेल्वे स्टेशनवर फर्स्ट क्लास वेटिंग रूमसुद्धा करण्यात यावी. सुरत-भुसावळ पूर्ववत करण्यात यावी. जळगाव स्टेशन संदर्भातील प्रवाशांच्या अनेक समस्यांसंदर्भात भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांचे निवेदन देण्यात आले.

डॉ. राधेश्याम चौधरी यांनी भुसावळ ते पुणेपर्यंत रोज रात्री एक्स्प्रेस सुरू केली, तर अनेक नागरिकांना फायदा होईल. दीपक साखरे यांनी उधना ते पाळधी ही मेमू गाडी जळगावपर्यंत वाढविण्यात यावी याची मागणी करण्यात आली. समिती सदस्य प्रकाश पंडित यांनी शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावर संरक्षक भिंत तत्काळ लावावी, जेणेकरून पुलावरून पडून अपघात टाळता येईल. जळगाव स्टेशनच्या बाहेर अवैध पार्किंग ठेका सुरू आहे. याबाबतीतसुद्धा तक्रार जळगाव मनपा आयुक्तांकडे करण्यात आली. त्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.

जळगाव स्टेशन सल्लागार समितीची मीटिंग प्रत्येक तीन महिन्यांना होऊन सर्व तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

Jalgaon: Officials of the committee present in the station advisory committee meeting.
सणाच्या नियोजनावर पाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com