Jalgaon KBCNMU News : उमवित उभारणार कवयित्री बहिणाबाई चौधरींचा पुतळा!

KBCNMU
KBCNMUesakal

Jalgaon KBCNMU News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा उभारण्यास शासनाने विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. (statue of poetess Bahinabai Chaudhary to establish in kbcnmu jalgaon news)

याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. लवकरच त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुतळा उभारण्याची घोषणा केली होती. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिले असले, तरी विद्यापीठात बहिणाबाईंचा पुतळा नाही, ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे भव्य पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा केली होती.

या अनुषंगाने त्यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२३-२४ मधून निधी देण्यात यावा, अशी मागणी ३१ जानेवारी २०२३ च्या पत्रान्वये केली होती. निधीसाठी त्यांनी सतत पाठपुरावाही केला होता.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

KBCNMU
Gold Rate Hike : सोन्याला ‘सोन्या’चे दिवस..! दशकात तब्बल 40 हजार रुपयांची दरवाढ..

शासनाने विशेष बाब म्हणून या पुतळ्याला मंजुरी दिली आहे. राज्य शासनाच्या नियोजन विभागाचे उपसचिव सं. ह. धुरी यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. याबाबतचे पत्र जिल्हा नियोजन समितीचे सचिव तथा जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

यात जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ मधून बचत केलेल्या निधीचे पुनर्विनियोजन करून इतर जिल्हा योजनेतून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरात बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा उभारण्याची परवानगी विशेष बाब म्हणून देण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. यामुळे भव्य पुतळ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

"विद्यापीठात दिलेला शब्द पाळला असून, बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्याचे काम मार्गी लागणार असल्याचा मला आनंद आहे. पुतळा उभारण्याची प्रक्रिया आता लवकरच मार्गी लावणार आहोत. निधीची कमतरता भासू देणार नाही." -गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव

KBCNMU
Jalgaon Water Shortage : 4 तालुक्यांत 6 टँकरद्वारे पाणीपुरवठा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com