व्हिडीओ कॉलवर विवस्त्र होत तिच्याशी बोलण वृद्धाला पडल महागात; बसला मोठा गंडा

whatsapp video calling
whatsapp video callingesakal
Updated on

जळगाव : मोबाईलवर व्हॉटसॲपचे संदेश पाठवले, व्हिडीओ कॉलवर (whatsapp video calling) स्वत:चे कपडे काढून वृध्दासही कपडे काढायला लावले. त्यानंतर व्हिडीओ रेकॉर्ड करुन ते, सोशल मीडियात (Social media) व्हायरल करण्याची धमकी देवून खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिच ऐकण चांगलच भोवल...

सायबर पोलिसांत दाखल तक्रारीत नमुद केल्या नुसार, भुसावळ शहरातील ५७ वर्षीय गृहस्थ कुटूंबासह वास्तव्यास आहे. सोमवार (ता. १८) रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सुभाष पांडूरंग लोखंडे यांना अनोळखी नंबरवरून एका महिलेचा व्हॉटसॲपवर पहिल्यांदा Hi असा संदेश आला. त्यानंतर तक्रारदारासोबत चॅटींगच्या माध्यमाने बोलणे सुरु झाले. जवळीकता साधत व्हॉटसॲपवर व्हिडीओ कॉल करून तिचे स्वत:चे अंगावरील कपडे काढून अश्लिल व्हिडीओ पाठविले. त्यानंतर ‘आप भी अपने कपडे उतारकर दिखाओ’ असे फिर्यादीस सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी देखील अंगावरील कपडे काढून चित्रीकरण केले. समोरील महिलेने लागलीच फिर्यादीचे कपडे काढलेला व्हिडीओ रेकॉर्ड केला.

whatsapp video calling
दिवसाला 20 सिगारेट ओढणारा शाहिद कसा बनला निर्व्यसनी?

त्यानंतर लागलीच फिर्यादीला रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत १० हजार ५८० रूपयांची खंडणी मागितली. फिर्यादीने घाबरून महिलेच्या खाते क्रमांकावर पैसे पाठविले. याबाबत तातडीने जळगाव सायबर पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दोन मोबाईलधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

whatsapp video calling
लिंबूचे दर रोखण्यासाठी चक्क तंत्र-मंत्र पूजा; भगवती मंदिरात दिला बळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhusawal green hydrogen project
Why were Jalgaon land officials arrested?
Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Marathi News Esakal
www.esakal.com