Latest Marathi News | भाडे मागणाऱ्या घरमालकाच्‍या डोक्यात टाकला दगड; भाडेकरुविरुद्ध गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beating.

भाडे मागणाऱ्या घरमालकाच्‍या डोक्यात टाकला दगड; भाडेकरुविरुद्ध गुन्हा

जळगाव : शहरातील सुप्रिम कॉलनीत दोन महिन्यांपासून बाकी असलेले घरभाडे मागितल्याचा राग आल्याने भाडेकरुने घरमालकाच्या डोक्यात दगड मारुन दुखापत केल्याची घटना घडली.

हेही वाचा: Wi-Fi सेटअप Perfect असुनही Internet काम करत नाही, ट्राय करा 'या' ट्रिक्स

सुप्रिम कॉलनी परिसरात सेवालाल चौकात संजय रघुनाथ कोळी (वय ४५) वास्तव्यास आहेत. त्यांचे घर त्यांनी गुणवंत विठोबा कोळी यास भाडेकरारावर दिले आहेत. बुधवारी (ता. १७) सायंकाळी संजय रघुनाथ कोळी यांनी दोन महिन्यांचे घरभाडे बाकी असून ते घरभाडे द्यावे म्हणून गुणवंत कोळी याच्याकडे तगादा लावला. त्याचा राग आल्याने गुणवंत कोळी याने दारूच्या नशेत शिवीगाळ तसेच दमदाटी करत संजय कोळी यांच्या डोक्यात दगड मारुन दुखापत केली. जखमी संजय कोळी यांच्या तक्रारीनुसार गुणवंत कोळी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक महेंद्र उदयसिंग पाटील हे करीत आहेत.

हेही वाचा: Vastu Tips : घरात हे बदल करा, पैशाची चणचण जाणवणार नाही

Web Title: Stone Was Thrown On The Landlords Head For Demanding Rent Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonCrime News