Rain Damage : नशिराबादला वृक्ष पडून घरांचे नुकसान; अर्धा तास चालले थैमान

A tree fell on the house during the storm that occurred on Thursday afternoon in the area
A tree fell on the house during the storm that occurred on Thursday afternoon in the area esakal

Jalgaon News : दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा बसत असताना, अचानक दुपारी तीननंतर वातावरण बदलून परिसरात वादळी वाऱ्याने थैमान घातले. त्यात काही घरांवर झाडे उन्मळून पडल्याने भिंतींचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. (stormy wind blew Damage to walls due to trees falling on houses jalgaon news)

दुपारी अचानक भयंकर सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले. या वाऱ्यात अनेकांच्या घरांचे पत्रे उडाले, केबल आणि नेटवर्कच्या ताराही तुटल्या. काही ठिकाणी जुनी मोठमोठी झाडे मोडून पडली.

खालची आळी भागात अनिल प्रभाकर पाटील यांच्या घरावर पिंपळाचे जुने झाड कोसळून वरच्या मजल्याचे नुकसान झाले. त्यात अनिल पाटील यांचे चुलत भाऊ रमेश सुका पाटील यांच्या घरातील सामानासोबतच दोन-तीन पोते ज्वारी, दोन-तीन पोते गहू व डाळी ठेवल्या होत्या, तेही खराब झाले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

A tree fell on the house during the storm that occurred on Thursday afternoon in the area
Jalgaon Covid Vaccination Campaign : जळगावात पुन्हा कोविड लसीकरणाचे अभियान

अनिल पाटील यांच्या घराशेजारचे चुडामण पितांबर पाटील यांच्या घराची आरसीसी भिंतही झाडामुळे तुटली. तसेच खादी ग्रामोद्योग परिसरातील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या बाजूचे पिंपळाचे झाडही मोडून पडले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील, मंडलाधिकारी आशिष वाघ, तलाठी रुपेश ठाकूर, श्रीमती सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सविस्तर पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

A tree fell on the house during the storm that occurred on Thursday afternoon in the area
Jalgaon Unseasonal Rain : भुसावळ पट्ट्यात वादळी पावसाचे थैमान; जामनेर तालुक्यात गारपीट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com