Latest Marathi News | चाळीसगावात अनोळखी तरुणाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sucide Case

Jalgaon News : चाळीसगावात अनोळखी तरुणाची आत्महत्या

चाळीसगाव : येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका अनोळखी तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात रेल्वे पोलिसांनी कळविल्यानुसार, चाळीसगाव रेल्वे स्थानकावरील खांबा क्रमांक ३२६/३६ जवळ साधारणतः ४० वर्षीय अनोळखी तरूणाने कपड्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी (ता. १८) उघडकीला आले. (Stranger in Chalisgaon Youth suicide Jalgaon News)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

हेही वाचा: Jalgaon News : पारोळातील महामार्गावर वाहतुकीचा कोंडमारा

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, मयताची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे. अनोळखी तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तपास सहायक फौजदार सुनील सावळे हे करीत आहेत.

हेही वाचा: Jalgaon Crime News : 16 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला विहिरीत