Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिवसाला आत्मदहन, अन्नत्याग; पोलिस यंत्रणेचा ताण वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Republic Day 2023

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिवसाला आत्मदहन, अन्नत्याग; पोलिस यंत्रणेचा ताण वाढणार

अमळनेर (जि. जळगाव) : न्याय्य, हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे, न्यायासाठी अविरत संघर्ष करीत असलेल्या तालुक्यातील काहींना प्रशासनाकडून अक्षम्य टोलवाटोलवी करत वाटाणाच्या अक्षता लावण्यात आलेल्या आहेत. (stress on police Administration on republic day due to Self immolation abstinence food by some people jalgaon news)

अशी काही क्षुब्ध मंडळी आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रजासत्ताक दिनी आत्मदहन, अन्नत्याग करण्याच्या तयारीत आहेत. काही अप्रिय घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी तालुका प्रशासन, पंचायत समिती आणि पोलिस दलापुढे मोठा ताण असणार आहे.

तालुक्यातील धानोरा-भोरटेक येथील ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांनी केलेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तक्रारदार जितेंद्र गंगाराम राजपूत हे अन्नत्याग उपोषण करणार आहेत.

राजपूत यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे ११ जून २०२२ ला चौदाव्या वित्त आयोग निधीत कथित गैरव्यवहारासंदर्भात तक्रार केलेली होती.

बीडीओंनी सरपंच, ग्रामसेवक यांना लाभ पोहचविण्याच्या हेतूने वस्तुस्थितीप्रमाणे कायदेशीर कार्यवाही न करता केवळ अनियमितता भासविण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदरचा चौकशी अहवाल वस्तुस्थिती विपर्यस्त असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी फेर अहवाल सादर करावा, या मागणीसाठी अन्नत्याग करणार आहेत.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Jalgaon News : तृणधान्यमुळे राहाल व्याधींपासून दूर; मान्यवरांनी सांगितले तृणधान्याचे महत्त्व

तर तालुक्यातील जानवे येथील सुभाष भिला पाटील हे जानवे ग्रामंपचायतीत शौचालय आणि घरकुल घोटाळ्यातील दोषींना शासन व्हावे म्हणून गत दोन वर्षांपासून सर्व पुराव्यानिशी संघर्ष करत आहेत. मात्र, अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी त्यांची तक्रार निकाली काढली आहे.

तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या प्रकरणाची चौकशीच केली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे ते प्रजासत्ताक दिनी थेट आत्मदहनच करणार आहेत. यासह पाडळसे प्रकल्पामुळे बाधित सात्री गाव पुनर्वसित गाववासीसुद्धा आंदोलनावर उतरणार आहेत.

हेही वाचा: Jalgaon Crime News : पातोंडा येथून 98 हजारांचे जनरेटर लंपास