Jalgaon News : मेहरुण चौपाटीवर विद्यार्थ्याची लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Jalgaon News : मेहरुण चौपाटीवर विद्यार्थ्याची लूट

जळगाव : मेहरूण तलाव ट्रॅकवर अनोळखी दुचाकीस्वारांनी तरुणाला चाकूचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन व कानातील बाळी, असा एकूण ४२ हजारांचा ऐवज बळजबरीने हिसकावून पोबारा केला.

जुन्या जळगावमधील जोशी पेठेतील रहिवासी संकेत सुनील माळी (वय १९) आई-वडीलांसह वास्तव्यास असून, शिक्षण घेत आहे. शनिवारी (ता. ४) दुपारी दोनला संकेत माळी मेहरूण तलाव ट्रॅकवरील एका बाकड्यावर बसला होता. (Student booty jewelry and money in mehrun chaupati jalgaon crime news)

हेही वाचा: प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

त्यावेळी विना क्रमांकाच्या दुचाकीवरून त्याच्याजवळ दोन अनोळखी तरुण आले. त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवून संकेतजवळील ४२ हजारांची सोन्याची चैन व कानातील बाळी बळजबरीने हिसकावून पोबारा केला.

हा प्रकार घडल्यानंतर संकेतने आराडाओरड केली. मात्र, दोघे चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते. रविवारी (ता. ५) रात्री दहाला एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अनोळखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे तपास करीत आहेत.