Student girl tying rakhi to District Collector Ayush Prasad during the Rakshabandhan program at Deepstambh Morale Center on Wednesday.
Student girl tying rakhi to District Collector Ayush Prasad during the Rakshabandhan program at Deepstambh Morale Center on Wednesday.

Rakshabandhan 2023 : मनोबलच्या विद्यार्थिनीने जिल्हाधिकाऱ्यांना बांधली पायाने राखी!

Rakshabandhan 2023 : चांगलं काम करत असताना स्वतःला रोज सिद्ध करावं लागतं. मात्र, या दबावाचा तुम्ही सकारात्मक विचार केल्यास आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल. तुम्ही तुमच्या क्षमता वाढवू शकले, तर तुमचं भविष्य नक्कीच उज्वल आहे.

दृढनिश्‍चय केला, तर या जगात अशक्य असं काहीच नाही. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी केले. (student tied rakhi to Collector with help of leg jalgaon news)

दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल प्रकल्पात रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे- पवार, डॉ. राहुल महाजन, डॉ. सोनाली महाजन, मानव संसाधन विकास सल्लागार सुहास कुलकर्णी प्रमुख पाहुणे होते.

पायाने बांधली राखी

दिव्यांग विद्यार्थिनी माऊली अडकूर हिने जिल्हाधिकारी प्रसाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना पायाने राखी बांधली. यजुर्वेंद्र महाजन यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल शिंदे हिने सूत्रसंचालन केले. आयुष्यात अनेक अडचणी आहेत; पण त्या पार करणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Student girl tying rakhi to District Collector Ayush Prasad during the Rakshabandhan program at Deepstambh Morale Center on Wednesday.
Rakshabandhan 2023 : आमदारांच्या कन्येने ‘त्या’ भावाला बांधली राखी! गोंडगाव येथे सहकुटुंब भेट

अडचणींचा प्रभाव योग्यतेवर पडता कामा नये. आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडा. मनोबलचे दिव्यांगस्नेही बांधकाम हे एक आदर्श उदाहरण आहे. अशा भावना श्री. अंकित यांनी या वेळी व्यक्त केल्या. या प्रसंगी सर्व मान्यवरांनी प्रकल्पाची पाहणी केली.

यांचा झाला सन्मान

जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांचा सेवापूर्तीनिमित्त सन्मान करण्यात आला. मनोबल प्रकल्पातील विद्यार्थ्यांना कायमच सेवा देणारे डॉ. राहुल व डॉ. सोनल महाजन या दांपत्याचा, तसेच मानव संसाधन विकास सल्लागार सुहास कुलकर्णी यांचाही या वेळी सन्मान झाला. प्रकल्पातील विद्यार्थिनींनी प्रमुख अतिथी, संचालक आणि विद्यार्थ्यांना राखी बांधली. संस्थेचे सचिव लक्ष्मण सपकाळे व संचालक परेश शहा उपस्थित होते.

Student girl tying rakhi to District Collector Ayush Prasad during the Rakshabandhan program at Deepstambh Morale Center on Wednesday.
Rakshabandhan 2023 : राजकीय विरोधावर वरचढ ठरले नात्याचे पावित्र्य! आमदार पाटील यांनी बहिण वैशालीकडून बांधली राखी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com