
Jalgaon : MPSC ची मुख्य परिक्षा न झाल्याने विद्यार्थी तणावात
जळगाव : ‘एमपीएससी’ची मुख्य परिक्षा २०२०’ (MPSC Mains Exam 2022) न झाल्याने या परिक्षेचे उमेदवार सध्या आर्थिक व मानसिक तणावाखाली आहेत.ही परिक्षा लवकर घेऊन भरती प्रक्रियेचा प्रश्न तत्काळ सोडवावा, उर्वरित भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी सोमवारी (ता.२३) एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. या परिक्षेचे तेरा हजार परीक्षार्थी आहेत. त्यांच्या भवितव्याचा प्रश्न परिक्षा न झाल्याने निर्माण झाला आहे. (Students gave Statement to collector for conducting MPSC main exam Jalgaon News)
नरेंद्र पाटील, श्याम कोळी, मुकेश पाटील, स्वप्नील पाटील, अजय गवळी, अविनाश वाघ, अमोल पाटील, नीलेश दळवी, दीपक सुसूंद्रे, रणधीर पवार, प्रमोद तावडे आदी परिक्षार्थींचा स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.
हेही वाचा: नाशिक : शहरात यंदा २०० मतदान केंद्रे वाढणार
या परिक्षेच्या पूर्व परीक्षेला तब्बल अडीच वर्षे उलटून गेली असून संबंधित भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या कारणामुळे २२ व २९ जानेवारी २०२२ रोजी नियोजित मुख्य परिक्षा न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली आहे. उच्च न्यायालयात याबाबत याचिका १७ फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल झालेली आहे. चार महिने उलटून देखील आजवर यावर एकही सुनावणी झालेली नाही. यामुळे सर्व उमेदवार प्रचंड मानसिक व आर्थिक तणावात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा: शहरातील अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढ
Web Title: Students Gave Statement To Collector For Conducting Mpsc Mains Exam Jalgaon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..