महसुलाच्या उत्पन्नात होणार वाढ; 12 गावांचे पोटखराब क्षेत्र लागवडीखाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

agriculture

महसुलाच्या उत्पन्नात होणार वाढ; 12 गावांचे पोटखराब क्षेत्र लागवडीखाली

फैजपूर (जि. जळगाव) : यावल तालुक्यातील १२ गावांमधील २०२ शेतकऱ्यांचे ९.६० आर. पोट खराब जमीन दुरुस्ती करून लागवडीखाली आली आहे. पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आल्यामुळे महसुलाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

यावल, रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वर्ग ‘अ’ जमीन शेत पोटखराब असलेले क्षेत्र असल्याने तो पोटखराब दुरुस्त करून लागवडीखाली आणल्यास शेताच्या उत्पन्नात वाढ होईल, शेतीचे कर्ज मिळेल, नैसर्गिक आपत्ती झाल्यास भरपाई मिळू शकते. आपल्या शेताची पोटखराब क्षेत्र दुरुस्त केल्याने किमतीत वाढ होते. पोटखराब क्षेत्र दुरुस्तीमुळे शासनाचा महसूल वाढतो. बागायती असल्यास जास्त लाभ मिळू शकतो. त्यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्याने पोटखराब क्षेत्र दुरुस्तीसाठी जवळच्या तलाठी कार्यालयात अर्ज सादर करावा व हे क्षेत्र दुरुस्ती करून लागवडीखाली आणावे, असे आवाहन फैजपूर प्रांत कैलास कडलग यांनी केले आहे.

हेही वाचा: दिव्यांगाच्या कलाकृतीची ‘इंडिया बुक रेकॉर्ड'कडून दखल

दरम्यान, यात हंबर्डी जमीन १.८५ - शेतकरी ७२, मारूळ जमीन २.५५ - शेतकरी ४९, उंटावद जमीन ०.३८ - शेतकरी ११, नावरे ०.८८ - शेतकरी ८, वाघझिरा ०.५१ - शेतकरी ५, महेलखेडी ०.२२ - शेतकरी ७, सातोद ०.४, - शेतकरी २, चितोडा ०.१२ - शेतकरी ५, डोंगरकठोरा ०.९८ - शेतकरी १०, डोणगाव ०.९ - शेतकरी ७, दहिगाव ०.६३ - शेतकरी ९, सांगवी १.३५ - शेतकरी १७ या गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपले पोट खराब दुरुस्त करून लागवडीखाली आणले. उताऱ्यातील पोटखराब क्षेत्र दुरुस्ती आदेशावर प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी शिक्कामोर्तब करून मंडळाधिकारी यांच्याकडे आदेश गावनिहाय पाठवले आहे.

हेही वाचा: ‘डाएट’मधील शिक्षकांच्या वेतनासाठी अखेर 9 कोटी

Web Title: Sub Poor Area Of 12 Villages Under Cultivation In Jalgaon District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonAgriculture News
go to top