
दिव्यांगाच्या कलाकृतीची ‘इंडिया बुक रेकॉर्ड'कडून दखल
फैजपूर (जि. जळगाव) : येथील रहिवासी तथा दिव्यांग सेना यावल तालुकाध्यक्ष योगेश गणेश चौधरी उर्फ मुन्ना यांच्या बाटलीतील विविध कलाकृतीची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली असून, २०२३ साठी त्यांना सुवर्णपदकाने सन्मानित केले आहे. त्यानिमित्त चौधरी यांचा मंगळवारी (ता. २४) श्री सतपंथ देवस्थान येथे सत्कार करण्यात आला.
राहुल कोल्हे सामाजिक मित्रमंडळ पिंपरुडचे दिव्यांग सेना फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतपंथ देवस्थानाचे गादीपती महामंडलेश्वर सतपंथरत्न जनार्दन हरीजी महाराज हे होते. याप्रसंगी त्यांनी प्रत्येकाने आपल्या मनातील दिव्यांगावर मात केल्यास आपले ध्येय सहज साध्य करता येते, असे प्रतिपादन केले आहे. योगेश चौधरी यांनी आपल्या सत्कारार्थी मनोगतातून दिव्यांग सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यासह महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज व आई-वडिलांचे आशीर्वाद यांचा या यशात सिंहाचा वाटा असल्याचे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
हेही वाचा: Success Story : सायकल दुरुस्ती करणाऱ्याच्या मुलाची 'गरूडझेप'
दरम्यान, याप्रसंगी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’कडून प्राप्त झालेले सुवर्णपदक, बॅच, ओळखपत्र, सन्मानपत्र, पेन आदी वस्तू महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांच्या हस्ते चौधरी यांना प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी राहुल कोल्हे, विशाल दांडगे, पराग वारके, उमाकांत पाटील, संजय सराफ, व्ही. ओ. चौधरी, पार्थ चौधरी, दिव्यांग सेना फैजपूरतर्फे शहराध्यक्ष नितीन महाजन यासह उपस्थित दिव्यांग सेना रावेर- यावल तालुका पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
हेही वाचा: Success Story : खोचला पदर आणि हाती घेतली शेतीची कमान!
Web Title: Notice Of Divyangas Artwork From India Book Record
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..