
गावातील वाघेश्वरी मंदिर परिसरात त्याने सुमारे 15 ते 20 वृक्षांची लागवड करून त्यांची निगा करून ती जगवली होती.
मेहुणबारे (ता.चाळीसगाव): दिवसभर शेतात बाजरीच्या पिकाला पाणी दिले. सायंकाळी मात्र घरी न परतताच त्याचा मृतदेह शेतातील एका झाडाळा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या तरुणाने झाडालाच दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने कुंझर गावात शोककळा पसरली आहे.
आवश्य वाचा- 'ती' च्या जिद्दीला सलाम.. गावाच्या समृद्धीसाठी एकटीचा लढा !
कुंझर (ता. चाळीसगाव) येथील योगेश आबा सिसोदे (वय22) हा तरुण काल (ता.13)रोजी शेतात बाजरीला पाणी देत होता.त्याचा चुलत भाऊ दीपक हा बाजरीला पाणी भरून सायंकाळी घरी गेला. मात्र योगेश हा घरी न जाता शेतातच थांबलेला होता. रात्री योगेशची आई योगेश घरी आला नाही म्हणून दीपककडे आली. दीपकने योगेशला फोन लावला पण तो उचलत नसल्याचे लक्षात आले.यानंतर दीपक तेवढ्या रात्री दुचाकीवरून शेतात गेल्यानंतर योगेशला आवाज दिला पण काहीएक प्रतिसाद मिळाला नाही. बॅटरीच्या प्रकाशात योगेशचा शोध घेत असतांनाच विहिरीजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला योगेश याने दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.
वाचा- जमीन संपादनात ' हेराफेरी '! 185 शेतकरयांना दिल्या तहसीलदारांनी नोटीसा
गावकऱ्यांची घटनास्थळी धाव..
ही माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. योगेश हा अत्यंत मनमिळावू स्वभावाचा होता. सामाजिक कार्यात तो सतत अग्रेसर असायचा.गावातील वाघेश्वरी मंदिर परिसरात त्याने सुमारे 15 ते 20 वृक्षांची लागवड करून त्यांची निगा करून ती जगवली होती. त्याने एकाकी आत्महत्येचा निर्णय घेतल्याने गावकरी सुन्न झाले आहेत. याप्रकरणी दीपक शिसोदे याने दिलेल्या माहीतीवरुन मेहूणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे