
गणेश यास खासगी बँकेत नोकरीसाठी कॉल आलेला होता. काही दिवसांतच तो बँकेत नोकरीवर रुजू होणार होता. मात्र त्यापूर्वीच..,
जळगाव : खंडेरावनगरातील एकवीस वर्षीय तरुणाने घरात एकटे असताना गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. गणेश बाविस्कर (वय २१) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याला नुकताच बँकेत नोकरीचा कॉल आलेला असताना त्याने अचानक मृत्यूला कवटाळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आवश्य वाचा- गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; जिल्हाधिकारींच्या सुचना
गणेश बाविस्कर (वय २१) हा कुटुंबीयांसह खंडेरावनगरात वास्तव्यास होता. सोमवारी (ता. १८) सकाळी त्याचे आई-वडील तसेच दोन्ही भाऊ व इतर नातेवाईक मनुदेवी या तीर्थक्षेत्रावर गेले होते. त्या वेळी गणेश हा घरी एकटाच होता. कुटुंबीय सायंकाळी सहाच्या सुमारास परतले असता, गणेश हा घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येऊन विच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद आहे. गणेश याच्या मागे आई सरला, वडील नरेंद्र बाविस्कर, भाऊ तुषार व दादू असा परिवार आहे. वडील नरेंद्र हे मजुरी करून उदरनिर्वाह भागवतात. तर दोन्ही भाऊ शिक्षण घेत आहेत.
आवर्जून वाचा- मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरीचा सुरू केला धंदा; हाणामारी केली आणि पोहचले तुरूंगात
बँकेत मिळणार होती नोकरी
गणेश यास खासगी बँकेत नोकरीसाठी कॉल आलेला होता. काही दिवसांतच तो बँकेत नोकरीवर रुजू होणार होता. मात्र त्यापूर्वीच गळफास घेऊन जीवन संपविले. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक महेंद्र पाटील करीत आहेत.
संपादन- भूषण श्रीखंडे