Amalner Bazar Samiti Election : अमळनेरला महाविकास आघाडीची सत्ता! बाजार समिती निवडणुकीत 11 जागांवर विजय

Market Committee election
Market Committee electionesakal

Amalner Bazar Samiti Election : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने विजय खेचून आणला असून, १६ पैकी तब्बल ११ जागांवर विजय मिळविला आहे. आमदार अनिल पाटील यांचे सहकार क्षेत्रातील प्राबल्य तसेच माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांची साथ यामुळे महाविकास आघाडीला विजय मिळविता आला आहे.

भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला असला तरी स्मिता वाघ यांनी स्वतः मात्र विजय मिळविला आहे. (Amalner Bazar Samiti Election Mahavikas Aghadi power to Amalner Won 11 seats in market committee elections)

अमळनेर बाजार समितीच्या १६ जागांसाठी रविवारी (ता. ३०) व्यापारी लायब्ररीत मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेल्या निकालात महाविकास आघाडी पुरस्कृत सहकार पॅनल ११, भाजप पुरस्कृत आपले शेतकरी विकास पॅनल ४ तर एका अपक्षाने बाजी मारली असून, व्यापारी मतदारसंघातील २ जागा आधीच बिनविरोध झालेल्या होत्या.

महाविकास आघाडीचे विजयी उमेदवारांना मिळालेली मते : सर्वसाधारण सोसायटी मतदारसंघ - अशोक पाटील (७२१), प्रा. सुभाष पाटील (६५६), सुरेश पाटील(५०७), डॉ. अशोक पाटील (४२१), भोजमल पाटील (३९४). महिला राखीव - सुषमा देसले(६३३), पुष्पा पाटील (५९१), इतर मागास वर्ग डॉ.अनिल शिंदे (७२६). वि.जा.भ.ज.मतदारसंघ- समाधान धनगर (६०६). ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ- सचिन पाटील (५१४),

एस.सी.एस.टी.मतदारसंघ- भाईदास भिल्ल (४३३). तर भाजप पुरस्कृत आपले शेतकरी विकास पॅनलला ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघातून स्मिता वाघ (७२६), ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून पाटील प्रफुल्ल (४८९), आर्थिक दुर्बल मतदारसंघातून पाटील हिरालाल (४०१),

हमाल मापाडी मतदारसंघातून शरद पाटील (१९५) हे विजयी झाले आहेत. तर सर्वसाधारण सोसायटी मतदारसंघातून नितीन पाटील (४०९) या एकमेव अपक्षाने विजय खेचून आणला आहे. व्यापारी मतदारसंघातून वृषभ पारख, प्रकाश अमृतकर आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Market Committee election
Nashik News : लोक अदालतीत 329 दावे निकाली; 3 कोटी 24 लाखांचा महसूल प्राप्त

‘मविआ’ला अपक्षांचा पाठिंबा

महाविकास आघाडीला अपक्षांचा पाठिंबा आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नितीन पाटील, वृषभ पारख व प्रकाश अमृतकार यांनी बाजार समिती व शेतकऱ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला असल्याचे सांगितले.

यामुळे महाविकास आघाडीच्या खात्यात १४ जागा झाल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी आर. आर. पाटील, सहाय्यक निर्णय अधिकारी व्ही. एम. जगताप, अमळनेरचे सहाय्यक निबंधक के. पी. पाटील, सुनील महाजन, वासुदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ८ टेबल वर २५ कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली.

पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Market Committee election
Success Story : वस्तीशाळेत शिकलेल्या गौरवची बँकिंग परीक्षेत गरुड भरारी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com