Summer Business : उन्हाळ्यात एसी, कूलरचा व्यवसाय थंड! यंदा केवळ 30 टक्‍के विक्री

ac cooler business
ac cooler businessesakal

Summer Business : उन्हाळ्यात उकाड्याने हैराण होत असताना, थंड हवेसाठी कूलर, एसीचा वापर होतो. फेब्रुवारीपासूनच या व्यवसायाला सुरवात होते. मात्र, यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ वातवरणामुळे हवेत गारवा आहे.

परिणामी, ऐन उन्हाळ्यात एसी आणि कूलरचा व्यवसाय थंड असल्‍याचे चित्र यंदा मार्केटमध्‍ये पाहावयास मिळत आहे. (Summer Business AC Cooler business low in summer This year only 30 percent sales jalgaon news)

उन्‍हाळ्याची चाहूल लागताच होलसेल विक्रेत्‍यांसह कुलरची दुरुस्‍ती करणारे लहान व्‍यावसायिक व विक्रेते सर्व माल भरून ठेवतात. त्‍यातच जळगावातील तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत पोहोचत असल्‍याने दरवर्षी कुलरची डिमांड मोठ्या प्रमाणात असते.

या संपूर्ण तीन ते चार महिन्‍यांच्‍या कालावधीत जळगाव जिल्‍ह्यात कोट्यवधींची उलाढाल होत असते. यंदा मात्र अवकाळी पावसामुळे उन्‍हाळ्यात गारवा देणाऱ्या कुलरचा व्‍यवसायच थंड पडला आहे.

बाजारपेठच ठप्प

उन्हाळ्याच्या काळात थंड हवेसाठी एसी, कूलरला मागणी असते. एका व्यक्तीपुरता किंवा सामान्‍य व्‍यक्‍ती कूलरचा वापर करीत असतो. साधे कूलर अडीच ते तीन हजार रुपयांना मिळते.

उन्हाळ्यात उकाड्यामुळे हैराण होत असल्याने कूलरची थंड हवा सर्वांनाच हवीहवीशी वाटते, पण यंदा ही बाजारपेठच ठप्प झाली आहे.

अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झालीच नाही. हवेत गारवा असल्‍याने कुलरची आवश्‍यकताच भासली नाही. यामुळे दरवर्षीच्‍या तुलनेत यंदा केवळ ३० टक्‍केच व्‍यवसाय झाला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ac cooler business
Nandurbar: चक्क आमदारच ट्रॅक्टर चालवतात तेव्हा...! आमदार पाडवींच्या बळीराजा स्टाइलची सोशल मीडियावर धूम

कारागीर रिकामेच

दरवर्षी मार्च महिन्यापासून बाजारात कूलर विक्रीला सुरवात होते. काही कारागीर पत्री कूलर बनवून विक्री करीत असतात, तर काही जण तयार कूलर आणून विकतात. तीन ते पाच हजारांपर्यंत त्यांची किंमत असते.

मात्र, यंदा मार्केटच ठप्‍प झाले आहे. वातावरण थंड असल्‍याने कूलर दुरुस्‍तीसाठी कोणी जात नाही. यामुळे दुरुस्‍ती करणारे कारागीर रिकामे बसून आहेत. शिवाय व्यवसाय ठप्प असल्याने त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

"दरवर्षाप्रमाणे उन्‍हाळ्याच्‍या अनुषंगाने जानेवारीतच संपूर्ण माल भरून ठेवला होता. मात्र, यंदा उन्‍हाळाच जाणवत नसल्‍याने कूलरची मागणी मंदावली आहे. दरवर्षीच्‍या तुलनेत यंदा केवळ ३० टक्‍केच व्‍यवसाय झाला आहे. संपूर्ण माल गुदामातच पडून आहे."

-मनीष माहेश्‍वरी, कूलर होलसेल विक्रेते

ac cooler business
Unseasonal Rain : अवकाळीमुळे कोबी बियाणे टाकण्यावर परिणाम; सामान्य वातावरणाची बळिराजाला प्रतिक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com