Jalgaon News : कौटुंबीक न्यायालयाच्या अधीक्षकाला लाच घेताना अटक

Arrested News
Arrested Newsesakal

जळगाव : तक्रारदाराला पोटगी देण्याची मुदत वाढवून देण्यासाठी जळगाव कौटुंबिक न्यायालयातील सहाय्यक अधीक्षकांना अवघ्या २०० रुपयांची लाच घेताना मागताना जळगाव लाचलुचपत विभागाने अटक केली.

चक्क न्यायालयातील अधीक्षकानेच दोनशे रुपयांसाठी लाज घालविल्याने जिल्‍ह्याच्या न्यायालयीन कर्मचारी, वकील आणि पोलिस दलात चर्चेला उधाण आले आहे.

तक्रारदाराचा कौटुंबिक वाद जळगाव शहरातील बी. जे. मार्केटमधील कौटुंबीक न्यायालयात खटला सुरू होता. तक्रारदाराने त्याची पोटगी देण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार कौटुंबीक न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक हेमंत दत्तात्रय बडगुजर यांनी लाचेची मागणी केली होती. (Superintendent of family court arrested for accepting bribe Jalgaon News )

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

Arrested News
Nashik Crime News : दहिदी शिवारातील विवाहितेचा खून चोरीच्या उद्देशाने; संशयित ताब्यात

लाच देण्याची इच्छा नसल्याने नाईलाजास्तव तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची खातरजमा झाल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, ईश्वर धनगर यांनी बी. जे. मार्केटमधील गोविंदा कॅन्टीन येथे सापळा रचला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचारी बी. जे. मार्केट परिसरातील कौटुंबीक न्यायालयाच्या आत-बाहेर पाळतीवर असताना, तक्ररदाराकडून सहाय्यक अधीक्षक हेमंत बडगुजर याने २०० रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याच्यावर झडप घातली. याबाबत जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून, हेमंत बडगुजर याची वैद्यकीय तपासणी करून कोठडीत टाकण्यात आले.

Arrested News
Jalgaon News : भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत भडगावला एकाचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com